आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rafale Fighter Pilot Will Wear Diaper During Flight, India Told By Aircraft Companies

...तर Diaper घालून लढाऊ विमान उडवतील Pilot, सरकारच्या प्रश्नावर कंपन्यांचे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हवाई दलासाठी 110 लढाऊ विमान खरेदी करत आहे. या विमानांच्या खरेदीसाठी भारत सरकार आणि हवाई दलाने विमान कंपन्यांना काही मजेशीर प्रश्न विचारले. त्यापैकीच एक म्हणजे, फ्लाइटमध्ये पायलटला अचानक लघू शंका आल्यास त्याची कॉकपिटमध्ये काय व्यवस्था आहे? यावर विमान कंपन्यांनी उत्तर दिले, की पायलट डायपर घालून उड्डान भरतील. जेणेकरून लघुशंकेसाठी इतर काही व्यवस्थेची गरज पडणार नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी एक माहिती जारी केली. त्यानुसार, फ्रान्सकडून 36 रफायल लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. त्या सर्वांचे संचालन करणारे पायलट डायपर घालतील. रफायल विमान सलग 10 ते 12 तास सलग उडण्यास सक्षम आहेत. 


फ्रान्सने नुकतेच अशा अनेक मोहिमा राबवल्या ज्यामध्ये रफायलने लांब उड्डान भरल्या आहेत. अशात स्वाभाविक आहे, की पायलटच्या लघुशंकेची व्यवस्था कॉकपिटमध्येच करण्यात आली असावी. ही नवीन विमाने मेक इन इंडिया अंतर्गत भारतात विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी भारताने रिक्वेस्ट फॉर इंफॉर्मेशनमध्ये भारताने आपल्या गरजा मांडल्या. त्यातील 20 क्रमांकाची रिक्वेस्ट ऑफ इंफॉर्मेशन कॉकपिटमध्ये पायलटला दिल्या जाणाऱ्या सुविधांवर चौकशी करण्यात आली आहे. लढाऊ विमानांसाठी पायलट अतिशय महत्वाचे असून त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. पायलटचा पोशाख ऑक्सिजन नळ्या आणि सुरक्षा हेलमेटने कसलेले असते. त्यामध्ये विमानात पायलटला नेचर कॉल आल्यास सुविधा द्यायला हव्या असे भारताचे मत आहे. भारतीय हवाई दलात सुखोई, मिग सिरीझच्या विमानांसह जॅग्वार, मिराज आणि स्वदेशी तेजस विमानाचा समावेश आहे. मिग सिरीझचे विमान सलग 3 ते 4 तासांसाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे मिग आणि इतर छोट्या पल्ल्याच्या विमानात पायलटला कॉकपिटमध्ये या सुविधेची गरज नाही. 


हे आहेत पर्याय
फायटर जेट पायलटला डायपर व्यतिरिक्त इतर काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये पीडल पॅकचा समावेश आहे. प्लास्टिकची पिशवी असलेल्या या पीडलमध्ये पावडर भरलेले असते. युरीन त्या पावडरमध्ये जाताच एक जेली तयार होते. ती सुरक्षितरित्या कॉकपिटमध्ये ठेवली जाऊ शकते. यास पायलट प्राधान्य देतात. पायलट पिण्याचे पाणी, फ्रूट जूस आणि जेवणासाठी न्यूट्री बार आपल्यासोबत घेऊन जातात. संधी मिळताच हेलमेटचे मास्क काढून पाणी पिणे, न्यूट्री बार खाणे याची प्रॅक्टिसने त्यांना सवय लागते. 

बातम्या आणखी आहेत...