आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा \'मोदी स्कॅम अलर्ट\', \'PM मित्रासाठी करत आहे 1 लाख कोटींची फायटर जेट डील\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला संरक्षण करारातील भ्रष्टाचारावरुन घेरले आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट करुन मोदी स्कॅम अलर्ट जारी केला. त्यात म्हटले आहे, 'मोदी मित्रांना लाभ व्हावा यासाठी 1 लाख कोटींची नवी फायटर प्लेन डील सुरु केली आहे.' याआधी राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीवरुन मोदींवर निशाणा साधला होता. नवा आरोप हा 110 फायटर जेट्सच्या डीलचा आहे. यासाठी हवाई दलाने टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. 

 

40 हजार कोटी फ्रान्सला दिले 
- राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये म्हटले, 'एक लाख कोटींच्या फायटर जेट डीलसाठी टेंडर सुरु झाले आहे. मोदींच्या मित्रांनी स्टॅटेजिक पार्टनर्ससोबत भागीदारी करण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. राफेल विमान खरेदीत देशाला 40 हजार कोटींचा भूर्दंड सहन करावा लागला होता. हा पैसा फ्रान्ससाठी होता, जेणेकरुन ते आपल्या मित्रासोबत दुसरी डील करु शकतील.'

बातम्या आणखी आहेत...