आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: नोटाबंदीमध्ये अमित शहांनी काळा पैसा पांढरा केल्याचा राहुल गांधींचा आरोप, Rahul Gandhi Accused Amit Shah For Converting Black Money During Demonetization #ShahZyadaKhaGaya

भाजप अध्यक्षांवर राहुल गांधींचा आरोप: नोटाबंदी काळात अमित शहा संचालक असलेल्या बँकेत 750 कोटी जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात सर्वात जास्त जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. अमित शहा ज्या अहमदाबाद सहकारी बँकेत संचालक आहेत तेथे सर्वाधिक जुन्या नोटा जमा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही खळबळजनक माहिती आरटीआयअंतर्गत मिळाल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे अनेक नेते बऱ्याचदा राहुल गांधींवर शेरेबाजी करत असतात. याचाच आधार घेत राहुल गांधींनी 'शाह ज्यादा खा गया', असा हॅशटॅग वापरून निशाणा साधला आहे.

 

राहुल गांधींनी केले हे ट्विट

"अभिनंदन, अमित शहा जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सरकारी बँक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 5 दिवसांत 750 कोटी! लाखो भारतीयांचे आयुष्य नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झाले, तुमच्या या कामगिरीला सलाम," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

 

पत्रकार परिषदेत सुरजेवालांनी साधला निशाणा

तत्पूर्वी, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अमित शहांवर हल्लाबोल केला. नोटाबंदी हा घोटाळाच असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी सुरजेवाला म्हणाले, "नोटाबंदीच्या काळात देशातील सहकारी बँकांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या, त्यात अहमदाबादच्या जिल्हा सहकारी बँकेत 10 ते 15 नोव्हेंबर या 5 दिवसांच्या काळात 745 कोटी रुपये जमा झाले. यात भाजपच्या अनेक नेत्यांची नावे आहेत, जी अमित शहांच्या जवळचे आहेत. मग बँकेत जमा झालेला हा पैसा आहे कुणाचा?"

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, राहुल गांधींनी केलेले Tweet  

बातम्या आणखी आहेत...