आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराचे नाव समोर आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. खासदार कमलनाथ यांनी या प्रकरणी पक्षावर टीका केली. भाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असे ठेवायला हवे असे, ते सोमवारी म्हणाले. दुसरीकडे राहुल गांधींनी, बलात्काराच्या आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी प्रधानमंत्री मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करावे असे म्हटले.
कमलनाथ म्हणाले-जनतेने विचार करण्याची गरज
कमलनाथ म्हणाले, मी एका ठिकाणी वाचले की, भाजपचे 20 नेते असे आहेत ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहे. जनतेने याचा विचार करायला हवा की, यांचे नाव बदलून बलात्कार जनता पार्टी ठेवावे.
राहुल म्हणाले-मोदींनी देशाच्या कन्यांना न्याय द्यावा
राहुल गांधींनी सोमवारी ट्वीट करून लिहिले, 2016 मध्ये देशात 19,675 अल्पवयीन मुलींबरोबर बलात्कार झाला. हे दुर्दैवी आहे. जर पंतप्रधान खरंच मुलींना न्याय मिळवून देण्याबाबत गंभीर असतील तर हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टाच तालवून दोषींना शिक्षा मिळवून द्यावी.
उन्नाव प्रकरणी भाजप आमदार आरोपी
उन्नाब बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेने स्थानिय आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तिने तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यानंतर पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. कोर्टाने या प्रकरणी युपी सरकारला फटकारले होते. आरोपीला अद्याप अटक का झाली नाही अशी विचारणा कोर्टाने केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.