आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे आहे, 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणणारे चौकीदार : पीएनबी प्रकरणी राहुल यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक सवाल केला आहे. राहुल गांधींनी ट्वीटद्वारे विचारले की, आधी ललित, मग माल्या आणि आता नीरजही फरार झाला. ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाला चौकीदार कुठे आहे. पीएनबीमध्ये 11356 कोटींच्या फ्रॉड केसवरून राहुल गांधींनी पंतप्रधानांवर मौन बाळगल्याचा आरोप केला आहे. 


असे आहे राहुल गांधींचे ट्वीट..  
"पहले ललित, फिर माल्या, अब नीरव भी हुआ फरार। कहां है ना खाऊंगा, ना खाने दूंगा कहने वाला देश का चौकीदार? साहेब की खामोशी का राज जानने को जनता बेकरार, उनकी चुप्पी चीख-चीखकर बताए वो किसके हैं वफादार".. अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. 


याआधीही केली टीका..
परीक्षेवर 2 तास भाषण, बँक घोटाळ्यावर 2 मिनिटही बोलत नाही 
राहुल गांधींनी रविवारीही एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला. राहुल म्हणाले, एक्झाममध्ये कसे पास व्हायचे, याबाबत पंतप्रधान 2 तासांचे भाषण देतात, पण 22 हजार कोटींच्या घोटाळ्यावर 2 मिनिटही बोलत नाहीत. 


लपत आहेत जेटली
रविवारीच ट्वीटमध्ये राहुल गांधींनी जेटलींवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले होते, अरुण जेटली लपत आहेत. एखाद्या आरोपीप्रमाणे वागणे बंद करा. आता तरी काही बोला. 

 

पीएमओला सर्वकाही माहिती 
शनिवारी काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, काय झाले, कशामुळे झाले आणि मोदी यावर काय पावले उचलच आहेत. पीएमओला याबाबत सर्व काही माहिती होते, असे समोर येतेय. नीरव मोदीच्या 22 हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती सरकारला आधीच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. 

 

पुढे वाचा, राहुल यांचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...