आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधिशांना मीडियासमोर यावे लागते हे लोकशाहीसाठी दुर्देवी - राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मांडावे लागले हे लोकशाहीसाठी दुर्देवी आणि दुरगामी परिणाम करणारे आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 

सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधिशांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन न्यायपालिकेत सर्वकाही आलबेल नसल्याचा आरोप केला होता. यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे आरोप गंभीर असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, विशेष सीबीआय कोर्टाचे जज बी.एच. लोया यांच्या मृत्यूची योग्य चौकशी होण्याची गरज आहे. 

 

ते म्हणाले, 4 न्यायाधिशांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांनी लोकशाहीला धोका असल्याचे म्हटले आहे, त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. न्यायाधिशांनी उपस्थित केल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. आपल्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे. मात्र त्यावर असा प्रश्न उपस्थित झाल्याने बोलावे लागत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...