आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - देशातील विविध राज्यांमध्ये एटीएममध्ये खणखणाट असल्याने नागरिकांना कॅशच्या चणचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांतील नागरिकांनी यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे म्हटले आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने संपूर्ण बँकिंग सिस्टीमच चुकीच्या धोरणांमुळे उध्वस्त केल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी
राहुल गांधींनी म्हटले की, सरकारने बँकिंग सिस्टीम उध्वस्त करून टाकली आहे. नीरव मोदी 30 हजार कोटी रुपये घेऊन पळून गेला. पण नरेंद्र मोदींनी त्याबाबत काहीही म्हटले नाही. मोदींनी जनतेच्या खिशातून 500 आणि 1000 च्या नोटा काढल्या आणि नीरव मोदीच्या खिशात टाकल्या. देशभरातील जनतेला रांगेमध्ये उभे केले. ते संसदेमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाही घाबरतात. ते त्याठिकाणी 15 मिनिटही उभे राहू शकत नाहीत.
आठ राज्यांत संकट
उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेशसह 8 राज्यांत रोख रकमेचे संकट तयार झाले आहे. भोपाळ, पाटणा, लखनऊ आणि अहमदाबादेतील कित्येक एटीएममध्ये ठणठणाट आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबद्दल सांगितले आहे. एक बँक ऑफिसर म्हणाले की, रिझर्व्ह बँकेकडून रोखीचा प्रवाह थांबल्याने ही परिस्थिती तयार झाली. ती दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारही आरबीआयच्या संपर्कात आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यामागे कट असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा गायब होत आहेत. याबाबत त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार याचा गांभीर्याने विचार करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.