आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात काँग्रेस नेत्यांनी अर्ध्या दिवसातच उरकला ‘उपवास’, नागपुरात गटबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ पुणे - जातीयवादी शक्तींना विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे साेमवारी देशव्यापी लाक्षणिक उपवास करण्यात अाला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही या अांदाेलनाला प्रतिसाद देण्याची ‘अाैपचारिकता’ पूर्ण केली. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या माेठ्या शहरात दाेन ते चार तासच उपवास करण्यात अाला. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या नेतृत्वात परभणीत अर्धा दिवस उपवास करण्यात अाला.


मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे शिवाजी टर्मिनस जवळील आझाद मैदानाबाहेर पक्षाच्या नेत्यांनी सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत अडीच तासाचा लाक्षणिक उपवास दिन पाळला. यावेळी उपस्थित नेते-कार्यकर्ते यांनी सामूहिकपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आवडती ‘वष्णैव जन तो तेने कहिए’ आदी भजन उपवास मंडपात गायली.


निरुपम म्हणाले की, ‘मोदी सरकारच्या द्वेषपूर्ण, दलितविरोधी भूमिकेमुळे काेरेगाव- भीमासारख्या हिंसाचाराच्या घटना देशात घडत आहेत. भाजप सरकार आजपर्यंत कायमच जातीयवादाच्या भूमिकेवर राजकारण करत आले आहे. त्यामुळेच देशातील नष्ट होत चाललेला सामाजिक सलोखा पुर्नस्थापीत करण्यासाठी काँग्रेसने उपवास दिन पाळला अाहे.’ या वेळी माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुरेश शेट्टी, आमदार अस्लम शेख, वर्षा गायकवाड, नसीम खान, अमिन पटेल, भाई अशोक जगताप, माजी आमदार चरणसिंह सपरा, मधु चव्हाण, बलदेव खोसा, प्रवक्ते अरुण सावंत अादी पदाधिकारी उपस्थित हाेते.


नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस चे उपोषण पार पडले. सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या आंदोलनाची दुपारी चार वाजता सांगता झाली. मात्र या आंदोलनातही गटबाजीचे प्रदर्शन घडलेच. माजी मंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील आंदोलनाला दांडी मारत भंडारा येथे आंदोलनात सहभागी होणे पसंत केले. माजी मंत्री अनिस अहमद हे देखील आंदोलनापासून दूर राहिले. जळगाव जिल्हा कांॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सात तास उपाेषण केले. धुळ्यातील उपाेषण मात्र चार तासातच उरकण्यात अाले.

 

सरकारच्या नाकर्तेपणामुळे दंगली : विखे पाटील

नाशिकमध्ये विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात साडेचार तास उपवास करण्यात अाला.  ‘मोदी सरकार हाय हाय.. केंद्र शासन हाय हाय.. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी.. जायतीयवादी भाजपा सरकारचा धिक्कार असो’ अशी घाेषणाबाजी या वेळी करण्यात अाली. विखे म्हणाले, ‘भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात दंगल उसळून निष्पापांचे बळी जात अाहेत. या सरकारला भारत बंद अांदाेलन, काेरेगाव- भीमा दंगल व्यवस्थित हाताळता अाली नाही.  देशभर सामाजिक तेढ निर्माण हाेत असून असून, त्यात संघ व भाजपच्याच  कार्यकर्त्यांचा सहभाग दिसत अाहे. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त हाेत अाहे.’

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...