आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची लढाई भ्रष्टाचाराविरोधात नाही, पंतप्रधान हेच मोठा भ्रष्टाचार- भाजपच्या पराभवानंतर राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकच्या जनतेच्या आवाजाचे आम्ही रक्षण केले आहे. - Divya Marathi
राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकच्या जनतेच्या आवाजाचे आम्ही रक्षण केले आहे.

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभेत भाजपच्या मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विजयी मुद्रेने पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करु शकत नसल्यामुळे बहुमत चाचणीआधीच येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडी सरकार स्थापन करणार आहे. 

 

भाजपच्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकाच्या जनतेला धन्यवाद देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. कर्नाटकच्या जनतेने पैसा, सत्ता हेच सर्वकाही नाही, हे दाखवून दिले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. लोकशाहीवर होत असलेले आक्रमण कर्नाटकात रोखले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांना जनतेने धडा शिकवला, असल्याचे ते म्हणाले. 

 

राहुल गांधी काय-काय म्हणाले... 
- पराभवातून भाजप-संघाने धडा घ्यावा. 
- भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या मोदींचा पर्दाफाश झाला आहे. 
- देशातील प्रत्येक व्यवस्थेला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. 
- पंतप्रधानपद हे कोणत्याही घटनात्मक संस्थेपेक्षा मोठे नाही. 

बातम्या आणखी आहेत...