आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस लवकरच जनतेचा विश्वास संपादन करेल : निकालांतील अपयशावर बोलले राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - नॉर्थ ईस्टच्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जनादेशावर सोमवारी राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया आली. त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. काँग्रेस लवकरच जनतेचा विश्वास जिंकेल. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला, तर मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही त्यांची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकांच्या  निकालांच्यावेळी राहुल आजीकडे इटलीत गेले होते. आता ते भारतात परतले आहेत. 


ट्वीटद्वारे दिली प्रतिक्रिया..  
- राहुल गांधींनी ट्वीट केले की, काँग्रेस पक्ष, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या जनतेने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करतो. ईशान्येतील राज्यांत पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेस काम करेल आणि पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करेल. 
- पक्षाच्या विजयासाठी मेहनत करणाऱ्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांनी आभार मानले. 
- ईशान्येकडील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेचे निकाल 3 मार्चला आले होते. 

बातम्या आणखी आहेत...