आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी 4 वर्षात फक्त बेरोजगारी, असुरक्षितता आणि गब्बरसिंह टॅक्स दिला - राहुल गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये जन आक्रोश रॅलीला सुरुवात झाली आहे. या रॅलीमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजावर टीका करत सर्व बाजुंनी मोदींवर हल्लाबोल केला. 

 

देश पंतप्रधानांच्या भाषणात सत्य शोधतो.. - राहुल गांधी
- राहुल गांधी म्हणाले, देश पंतप्रधानांच्या भाषण ऐकूण त्यात सत्य शोधत असतो. 
- मोदी भ्रष्टाचार हटवण्याबाबत बोलतात, पण कर्नाटकात त्यांच्याबरोबर जे येडियुरप्पा उभे आहेत, ते स्वतः तुरुंगात गेलेले आहेत. 
- सरकारने पाचशे आणि एक हाजाराच्या नोटा रद्द करत म्हटले की आम्ही काळ्या पैशाविरोधात लढत आहोत. संपूर्ण देशातील जनता रांगेत उभी राहिली. 
- काबही महिन्यांनी समजले की, जनतेचा सर्व पैसा नीरव मोदीच्या खिशात गेला आणि तो देश सोडून फरार झाला. 
- लष्कर म्हणते, शस्त्र खरेदीला पैसा नाही. मनमोहन सरकारमध्ये राफेल डील झाली होती. मोदी फ्रान्सला जातात आणि कॉन्ट्रैक्ट बदलतात. आम्ही 700 कोटींमध्ये विमाने खरेदी केली. मोदींनी ही किंमत 1500 कोटींवर नेली. 
- सुप्रीम कोर्टाचे चार जज प्रथमच जनतेसमोर येतात. साधारणपणे जनता सुप्रीम कोर्टात जाते. ते जज म्हणतात आम्ही भारताच्या जनतेकडून न्याय मागतो.  

 

काय म्हणाल्या सोनिया गांधी...

>> मोदीजी म्हणाले होते न खाऊंगा और ना खाने दुंगा, पण प्रत्यक्ष भ्रष्टाचारात प्रचंड वाढ झाली आहे.  

>> आज देशात सगळीकडे असत्य आणि अन्यायाचा बोलबाला आहेे.

>> असत्याच्या विरोधात जो कोणी आवाज उठवतो, त्याला सरकारच्या रागाचा सामना करावा लागतो. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...