आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rahul Plane Develops Technical Snag, Congress Says Possible Intentional Tampering Need To Examine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींच्या विशेष विमानात बिघाडानंतर इमर्जन्सी लँडिंग, काँग्रेसची चौकशीची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसने कर्नाटक पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, विमानात जाणून बुजून बिघाड केल्याच्या शक्यतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.-फाइल - Divya Marathi
काँग्रेसने कर्नाटक पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, विमानात जाणून बुजून बिघाड केल्याच्या शक्यतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.-फाइल

नवी दिल्ली - काँग्रेसने कर्नाटक पोलिसांना पक्ष लिहत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विशेष विमानात अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडाची तक्रार केली. पार्टीने म्हटले की, याची चौकशी केली जावी. राहुल गुरुवारी दिल्लीहून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कर्नाटकला रवाना झाले होते. स्पेशल विमानात त्यांच्याबरोबर कौशल विद्यार्थी आणि आणखी तिघेजण होते. कौशल विद्यार्थी यांनी पत्रामध्ये डीजी आणि आयजी यांना म्हटले की, राहुल गांधी ज्या विमानाने जाणार होते, त्यात अनेक तांत्रिक बिघाड झाले. रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान मोदींनी या प्रकारानांतर राहुल गांधींना फोन करून त्यांची चौकशी केली. 


काँग्रेसची 6 पॉइंटमधील पोलिस तक्रार 
1. कौशल यांनी लिहिले, मी विशेष विमान VT-AVH द्वारे गुरुवारी सकाळी सुमारे 9.20 वाजता दिल्लीहून हुबळीकडे निघालो. फ्लाइटमध्ये माझ्याबरोबर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, एसपीजी अधिकारी रामप्रित, राहुल रवी आणि राहुल गौतम होते. विमान सुमारे 11.45 वाजता हुबळीला पोहोचणार होते. 


2. सकाळी सुमारे 10.45 वाजता अचानक विमान डाव्या बाजुला झुकले आणि हेलकावे खाऊ लागले. हवामानही स्वच्छ होते. हवेचा वेगही अधिक नव्हता. विमानाचे ऑटो पायलट फंक्शनही काम करत नव्हते असे वाटले. विमानाच्या लँडिंगसाठी तीन वेळा प्रयत्न करण्यात आला. तिसऱ्यांदा सुरक्षित लँडिंग झाले. 


3. विमानाने सुमारे 11.25 वाजता हुबळीमध्ये लँडिंग केले. या दरम्यानही विमान हेलकावे खात होते. काहीतरी विचित्र आवाजही येत होता. 


4. या बिघाडामुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली. सर्वांनाच जीवाची काळजी वाटू लागली होती. विमानातील क्रू मेंबर्सही घाबरलेले होते. हा अनुभव अत्यंत भयावह होता, असेही ते म्हणाले. 


5. विमानाच्या संशयास्पद आणि बिघाडाच्या उड्डाणावरून हे स्पष्ट होते की, ही घटना नेहमीसारखी किंवा हवामानाशी संबंधित नव्हती. हे तांत्रिक बिघाडामुळे घडलेली होती. विमानात मुद्दाम बिघाड केल्याच्या संशयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याची चौकशी व्हायला हवी. 


6. विमान उड्डाणादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी आणि ऑटोपायलट काम करत नसल्याने विमानाच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. विमानात छेडछाड केल्याची शक्यताही निर्माण होते. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले असते. या प्रकरणात संपूर्ण विमान आणि त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या विमानाला पुन्हा उड्डाण घेण्याची परवानगी दिली जाऊ नये अशीही आमची विनंती आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...