आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल म्हणाले,‘डिलीट नमो अॅप’ तीन तासांत काँग्रेसचेच अॅप डिलीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी अॅपचा डाटा थर्ड पार्टीशी शेअर होत असल्याच्या आरोपांदरम्यान सोमवारी काँग्रेसही डाटा लीक वादात अडकली. नरेंद्रमाेदी अॅपचा गौप्यस्फोट करणारा फ्रेंच अभ्यासक इलियॉट एल्डरसनने दावा केला की, काँग्रेस पक्षाचे अॅप ‘विथ आयएनसी’चा डाटा सिंगापूरमध्ये जातो. त्यानंतर लगेचच काँग्रेसने आपले अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्याची घोषणा केली. सदस्य नाेंदणीची वेबसाइटही बंद केली. तत्पूर्वी, सकाळी ११ वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नमाे अॅप डिलीट करण्याचे आवाहन केले होते. 


एल्डरसनच्या दाव्यानंतर, भाजप अायटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल यांच्याच शैलीत टोला मारत म्हटले की, ‘हॅलो, माझे नाव राहुल गांधी आहे. मी भारताच्या सर्वात जुन्या पक्षाचा अध्यक्ष आहे. तुम्ही जेव्हा माझ्या अधिकृत अॅपवर येता तेव्हा मी तुमचा डाटा सिंगापुरातील आपल्या मित्रांना देतो.’


एल्डरसनने सोमवारी ट्विटरवर सांगितले की, काँग्रेसच्या अँड्रॉइड अॅपमध्ये सदस्यत्वाच्या अर्जाचा डाटा  membership.inc.in वर जातो. दाव्यानुसार, हा डाटा या लिंकच्या माध्यमातून सिंगापूरमधील सर्व्हरवर सेव्ह होतो. त्याची एन्कोडिंग बेस-६४ सोबत केली जाते, जी एन्क्रिप्टेड नसते. ती डिकोड करणे अत्यंत सोपे आहे. भारताच्या राजकीय पक्षांनी त्यांच्यासाठी भारतातच सर्व्हरची व्यवस्था करावी, असा सल्लाही त्याने दिला. 

 

- भाजपचा आरोप : काँग्रेस हा डाटा नक्षलवादी, दगडफेक करणारे, भारताचे तुकडे करण्याची भाषा बोलणारी गँग, चीनचा दूतावास आणि केम्ब्रिज अॅनालिटिका यांना देते. 

- काँग्रेसचे स्पष्टीकरण : अॅप फक्त पक्ष सदस्यत्वासाठी वापरले जात होते. ५ महिन्यांपासून ते वापरात नव्हते. १६ नोव्हेंबरपासून सदस्यत्व थेट वेबसाइटवरून दिले जात आहे.

 

मोदींना भारतीयांची हेरगिरी आवडते : राहुल गांधी
मोदीजींचे नमो अॅप आपले मित्र व परिवारातील सदस्यांचे ऑडिओ, व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करत आहे. जीपीएसद्वारे लोकेशनही ट्रॅक करत आहे. ते बिग बॉस आहेत, ज्याला  भारतीयांची हेरगिरी आवडते. मोदी पदाचा दुरुपयोग करून नमो अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांचे डाटाबेस तयार करत आहेत. पंतप्रधानाच्या रूपात त्यांनी पीएमओच्या अॅपद्वारे संवाद साधायला हवा. हा डाटा भारताचा आहे, माेदींचा नाही. 
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

 

काँग्रेस आपला डाटा सिंगापुरला का पाठवते : इराणी
राहुल गांधीजी, अॅपवर सर्वसामान्यपणे परवानगी घेतल्याचा अर्थ हेरगिरी केली जातेय, असा नसतो. हे तर छाेटा भीमलाही माहीत आहे. आज जेव्हा आपण तंत्रज्ञानाबाबत बोलत आहोत तेव्हा राहुलजी काँग्रेस आपला डाटा सिंगापूर सर्व्हरला का पाठवते? तो कुणीही एैरागैरा आणि अॅनालिटिकासह घेऊ शकतो? याचे उत्तर तुम्ही देणार का?
- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री