आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांची फ्लेक्सी फेअरमधून सुटका हाेणार : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना नोव्हेंबरपासून फ्लेक्सी फेअरमध्ये दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्थापलेल्या समितीचा अहवाल या आठवड्यात येणार आहे. यानंतर फ्लेक्सी फेअरपासून दिलासा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 


फ्लेक्सी फेअर सुरू झाल्यामुळे राजधानी, शताब्दी आणि दुरांतो रेल्वेगाड्यांची कमाई वाढली, मात्र सुमारे २० टक्के जागा रिकाम्याच राहू लागल्या. यामुळे या पद्धतीवर मोठी टीका होत होती. 
जागा रिकाम्या राहत असल्याच्या प्रश्नावर गोयल म्हणाले, फ्लेक्सी फेअर हे त्यामागील कारण नाही. काही महिन्यांत प्रवासी संख्या कमी झाली अाहे. सध्या ७० गाड्यांत फ्लेक्सी फेअर लागू आहे. यामुळे दरवर्षी ६०० कोटींचा फायदा होत आहे. १०% जागा आरक्षित झाल्यानंतर रेल्वेत फ्लेक्सी फेअर पद्धत लागू होते. गोयल म्हणाले, आम्ही समितीला जशा सूचना दिल्या आहेत, तसा अहवाल आल्यास तो मंजूर केला जाईल. त्याची अंमजबजावणी करण्यास महिनाभर लागू शकतो. तिकीट आरक्षण ४ महिन्यांआधीच सुरू होत असल्याने ते त्यात जोडावे लागतील. 

बातम्या आणखी आहेत...