आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज बब्बर - शांताराम नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडले, आता काँग्रेसमध्ये तिसरा राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे नुकतेच 84वे राष्ट्रीय अधिवेशन झाले, त्यानतंर पक्षात बदलाचे वारे वाहताना दिसू लागले आहे. पक्षाच्या दोन प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. गोवा आणि गुजरात नंतर राज बब्बर यांचा हा तिसरा राजीनामा आहे. उत्तर प्रदेशचे अध्यक्ष राज बब्बर  यांनी प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पक्षाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 

 

का दिले राजीनामे? 
- काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, राज बब्बर यांनी बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा हायकमांडकडे पाठवला आहे. 
- सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या गोरखपूर, फुलपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रदर्शन अतिशय वाईट राहिले होते. त्यामुळे राज बब्बर यांच्याविरोधात पक्षात उघड नाराजी व्यक्त होताना दिसत होती. 
- महाअधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते की पक्षात मोठे बदल होतील. 
- असे म्हटले जाते की राज बब्बर यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. राज बब्बर हे बरीचवर्षे समाजवादी पक्षात सक्रीय होते त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

 


नाइक यांनीही दिला राजीनामा 
- राज बब्बर यांच्याआधी काँग्रेसचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी राजीनामा दिला होता. नाईक म्हणाले होते की पक्षामध्ये युवकांना संधी मिळाली पाहिजे या राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी ते सहमत आहेत. 
- नाईक म्हणाले होते, मी गोवा अध्यक्षपद सोडले आहे. युवकांना संधी देण्याची गरज आहे. नाईक फक्त वर्षभर या पदावर होते. 

 

काँग्रेसचे अद्याप स्पष्टीकरण नाही 
- काँग्रेसच्या दोन प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप पक्षाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अशी माहिती आहे की हायकमांड या दोन्ही नेत्यांशी चर्चा करुन त्यावर पक्षाची भूमिका सांगतिल. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस उत्तर प्रदेशात एखादा ब्राम्हण चेहरा समोर आणण्याची शक्यता आहे.