आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • राजेशसह 4 गँगस्टर चकमकीत ठार Rajesh Bharti Gang Encounter With Police In Delhi

दिल्लीत 1 लाखांचे बक्षिस असलेल्या राजेशसह 4 गँगस्टर चकमकीत ठार, 6 पोलिस जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ दिल्लीत दहशत निर्माण करणाऱ्या राजेशचा चकमकीत मृत्यू झाला. - Divya Marathi
साऊथ दिल्लीत दहशत निर्माण करणाऱ्या राजेशचा चकमकीत मृत्यू झाला.

नवी दिल्ली - साऊथ दिल्लीच्या छतरपूर भागात शनिवारी पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. यात 5 गुंड जखमी झाले, यातील 4 जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. चकमकीत 6 पोलिस जखमी झाले आहेत. साऊथ दिल्लीत दहशत असलेला गँगस्टर राजेश भारतीचाही या चकमकीत मृत्यू झाला आहे. त्याच्यावर पोलिसांनी 1 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. 

 

मोठ्या घातपातासाठी दिल्लीत आले होते.. 
- दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की राजेश आणि त्याचे साथीदार छतरपूर भागात एक मोठी कारवाई करणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप रचला होता.

 

हरियाणा पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता राजेश 
- राजेश भारती हा दिल्ली-एनसीआरचा कुख्यात गुंड होता. शेजारील राज्यांमध्येही त्याच्यावर गुन्हे नोंद होते. त्याच्यावर पोलिसांनी 1 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. 
- एकदा त्याने हरियाणा पोलिसांच्या तावडीतून पळ काढला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...