आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सच्चर कमिटीमुळे चर्चित जस्टीस राजिंदर सच्चर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश जस्टीस राजिंदर सच्चर यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. भारतातील मुस्लीमांच्या स्थितीवर अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जस्टीस सच्चर कमिटीमुळे त्यांचे नाव अनेक वर्षे चर्चेत राहिले. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1923 ला झाला होता. जस्टीस सच्चर अनेक दिवसांपासून आजारी होते आणि नुकतेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


जस्टीस सच्चर यांनी मानवी हक्कांसाठी अनेकदा लढा दिला होता. जस्टिस सच्चर यांनी 1952 मध्ये वकिली करून करिअरची सुरुवात केली होती. 8 डिसेंबर 1960 मध्ये सुप्रीम कोर्टातही त्यांनी वकिली सुरू केली होती. 12 फेब्रुवारी 1970 ला ते दोन वर्षांसाठी दिल्ली हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश होते. 5 जुलै 1972 ला त्यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश बनवण्यात आले. त्याशिवाय ते राजस्थान आणि सिक्कीम येथील हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायाधीशही होते. 


सच्चर कमेटीमुळे चर्चेत 
भारत सरकारने 9 मार्च, 2005 ला देशातील मुस्लिमांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती तपासण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. त्या समितीला सच्चर समिती नावाने ओळखले गेले. सच्चर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2006 मध्ये 400 पानांचा अहवाल लोकसभेत सादर केला होता. त्यात मुस्लिमांविषयी अनेक शिफारसी करण्यात आल्या होत्या. या समितीमुळे सच्चर यांच्या नावाची प्रचंड चर्चा झाली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...