आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीश यांनी भरकोर्टात अपमानित केल्‍याने राजीव धवन यांनी सोडली वकिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी भरकोर्टात अपमानित केल्याचा आरोप करत ज्येष्ठ वकील आणि संविधानतज्ज्ञ राजीव धवन यांनी तावातावाने वकिली सोडली आहे. अयोध्या वाद आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत ७ डिसेंबरला सुनावणी सुरू होती. ‘न्यायालयात ओरडणारे ज्येष्ठ वकील बनण्याच्या लायकीचे नाहीत,’ अशी टीका तेव्हा सरन्यायाधीशांनी केली होती. 

 

त्यावर धवन यांनी सोमवारी सरन्यायाधीशांना पत्र लिहून सांगितले की, ‘सुनावणीच्या वेळी माझा झालेला अपमान पाहून मी वकिली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ वकील या नात्याने मला दिलेला गाऊनही आपण परत घेऊ शकता. तथापि, माझ्या कारकीर्दीतील आठवण म्हणून हा गाऊन मला जवळ ठेवण्याची इच्छा आहे.’ याप्रकरणी सरन्यायाधीशांनी काहीही बाेलण्यास नकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...