आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेठमलानी म्हणाले- कर्नाटकात राज्यपालांचा निर्णय निरर्थक; वकिली सन्यासानंतरही पोहोचले सुप्रीम कोर्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम जेठमलानी शुक्रवारी सुनावणीवेळी कोर्टात हजर राहाणार आहे. - Divya Marathi
राम जेठमलानी शुक्रवारी सुनावणीवेळी कोर्टात हजर राहाणार आहे.

नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी (95) यांनी कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. जेठमलानी यांनी 10 महिन्यांपूर्वी वकिलीतून सन्यास घेतला आहे, त्यानंतर गुरुवारी ते प्रथमच सुप्रीम कोर्टात पोहोचले. जेठमलानी यांनी दाखल केलेल्या अर्जात वजूभाई वाला यांचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये जे काही झाले आहे, त्यावरुन म्हणता येते की लोकशाही व्यवस्था नष्ट झाली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी 104 जागा असलेल्या भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रित केले आणि आज (गुरुवारी) सकाळी येदियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथही दिली. काँग्रेस आणि जेडीएस देखील राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले आहे. त्यांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

 

कोणत्याही पक्षाकडून कोर्टात आलो नाही 
- जेठमलानी त्यांचा अर्ज घेऊन सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस (सीजेआय) दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आले. ते सरन्यायाधीशांना म्हणाले, मी येथे कोणत्याही पक्षाच्या वतीने आलो नाही तर स्वतःहून आलो आहे. 
- यावर सीजेआय म्हणाले की हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठासमोर आहे. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. तुम्ही तुमचा अर्ज त्याच खंडपीठासमोर ठेवा. 
- जेठमलानी मीडियाला म्हणाले, 'राज्यपालांचा आदेश संविधानाच्या शक्तींचा पूर्णपणे दुरुपयोग करणारा आहे. कोर्टाने यात दखल दिली पाहिजे. मी शुक्रवारी कोर्टात उपस्थित राहाणार आहे.'


कर्नाटकात लोकशाही व्यवस्था नष्ट झाली 
- वृत्तसंस्थेशी बोलताना जेठमलानी म्हणाले, 'कर्नाटकात जे काही झाले त्यावरुन स्पष्ट आहे की लोकशाही व्यवस्था तिथे नष्ट झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये पक्षांनी दखल दिली नाही पाहिजे. सर्वांना माहित आहे की भाजपने जे सांगितले ते राज्यपालांनी केले आणि असा मूर्खपणाचा निर्णय घेतला आहे. तुम्ही वैयक्तिक हितासाठी आकडे सार्वजनिक करणार नसाल तर ते घटनाबाह्य आहे. राज्यपालांना भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण देऊन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करुन दिले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...