आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मि‍स्‍त्रीमुळे बुडाली Nano आणि Maruti ला झाला फायदा, रतन टाटांच्या पत्राने झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली - टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि सायरस मि‍स्‍त्री यांच्यातील भांडणा परिणाम ग्रुप आणि कंपनीची कार Nano ला झाला. या भांडणामुळे टाटा मोटर्सने ओला आणि उबरकडून मिळणारी Nano आणि Indica ची मोठी ऑर्डर गमावली. दुसरीकडे याचा फायदा Maruti Suzuki ला झाला. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) च्या मुंबई बेंचने 9 जुलैला मिस्त्री आणि त्याच्या कंपन्यांकडून दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. बेंचच्या 368  पानांच्या ऑर्डरमध्ये समोर आले की, सुमारे तीन वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने एक मोठी ऑर्डर गमावली होती. 


रतन टाटांचे मिस्त्रींना पत्र 
ऑर्डरनुसार, टाटांनी मिस्त्रींना 16  सप्टेंबर 2015  ला एक पत्र लिहिले होते. त्यात ओलाकडून देण्यात आलेल्या खरेदी प्रस्तावाचा उल्लेख आहे. रतन टाटांनी लिहिले की, तुमच्या लक्षात असेल की 1 सप्टेंबरला आपण पुण्यात बरोबर होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, भावेश अग्रवाल (ओला कॅबचे को-फाऊंडर) यांनी मला 10,000 नॅनो आणि इंडि‍का/इंडि‍गो टाटा मोटर्सकडून खरेदी करण्याचा, लीज किंवा जॉइंट व्हेंचरबाबत उत्सुकता दाखवली होती. ते टाटा मोटर्सकडून वर्षाला 1.50 लाख गाड्या खरेदी करण्याच्या विचारात होते. 


टाटा मोटर्सला होती डीलची गरज 
रतन टाटांनी लिहिले, ओलाला टाटा मोटर्सबरोबर ही डील करायची होती. पण टाटा मोटर्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे मारुती-सुजुकी यासाठी त्यांच्या मागे लागले होते. टाटांनी असेही लिहिले की, टाटा मोटर्सने ही डील करावी अशी त्यांना आशा होती. कारण त्यावेळी टाटा मोटर्ससे सेल्सचे आकडे खाली येत होते. त्याशिवाय नव्याने मार्केटमध्ये आलेली बोल्‍ट आणि झेस्‍टला मार्केटने नाकारले होते. 

 
पुढे वाचा, आणकी काय म्हणाले रतन टाटा.. 


 

बातम्या आणखी आहेत...