आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी; इंटरपोलची कारवाई, १९२ देशांत दिसल्यास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पीएनबीला १३५०० काेटींचा गंडा घालून फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याचा भाऊ निशाल मोदी व कर्मचारी सुभाष परब यांच्याविरुद्धही नोटीस जारी केली. 


या नोटिसा २९ जूनलाच जारी झाल्या. मात्र इंटरनॅशनल पोलिस कोऑपरेशन एजन्सीने त्या सोमवारी सार्वजनिक केल्या. नीरवविरुद्ध सीबीआयकडून दाखल आराेपपत्र आणि मुंबईच्या कोर्टाने जारी केलेले अटकेच्या वॉरंटच्या अाधारावर ही नोटीस जारी केली आहे. 


रेड कॉर्नर नोटिसमध्ये इंटरपोल १९२ सदस्य देशांना सांगते की, फरार गुन्हेगार त्यांच्या देशात दिसला तर त्याला तत्काळ अटक करावी. यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होते. विशेष म्हणजे, जानेवारीत घोटाळ्याचा गौप्यस्फोट झाल्यानंतर नीरव त्याची अमेरिकी पत्नी अॅमी मोदी, भाऊ निशाल, मामा मेहुल चौकसी हे देश सोडून फरार झाले होते. नीरव व त्याचा मामा मेहुलने तपासात सहभागी होण्यासाठी भारतात येण्यास नकार दिलेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...