आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Responding To Vajpayee\'s Treatment, In The Hospital Until The Infection Is Reduced

अटलबिहारी वाजपेयींचा उपचारांना प्रतिसाद, इन्फेक्शन कमी होईपर्यंत रुग्णालयातच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी एम्समध्ये होते. एम्सने जारी केलेल्या माहितीनुसार, वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना इंजेक्शनच्या माध्यमातून प्रतिजैविके दिली जात आहेत. या उपचारांना ते चांगला प्रतिसाद हेत असून त्यांच्या शरीरातील इन्फेक्शन कमी होईपर्यंत ते रुग्णालयातच राहतील.


युरिनरी ट्रॅक्ट आणि श्वसन मार्गात विषाणूबाधेमुळे तसेच किडनीच्या समस्येमुळे ९३ वर्षीय वाजपेयी यांना सोमवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांचे एक पथक वाजपेयींची नियमित तपासणी करत आहे. वाजपेयी कार्डिओ-थोरेसिस सेंटरच्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. दरम्यान, वाजपेयी दाखल असलेला अतिदक्षता विभाग पहिल्या मजल्यावर असून या ठिकाणी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देशभर प्रार्थना : वाजपेयी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून देशातील अनेक भागांत प्रार्थना व हवन-यज्ञ केले जात आहेत. दिल्ली भाजप युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष पंकज जैन यांनी एम्सच्या गेट नंबर-१ वर हवन केले. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी हवन करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...