आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल : भारतीय दुतावासावर रॉकेट हल्ला, ITBP बॅरेकचे मोठे नुकसान, स्वराज यांनी दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुषमा स्वराज यांनी स्वतः ट्विट करुन हल्ल्याची माहिती दिली. इंडियन अॅम्बेसी अफगाणिस्तानातील राजधानीच्या ग्रीन झोनमध्ये आहे. याला सर्वाधिक सुरक्षित भाग समजले जाते. (फाइल) - Divya Marathi
सुषमा स्वराज यांनी स्वतः ट्विट करुन हल्ल्याची माहिती दिली. इंडियन अॅम्बेसी अफगाणिस्तानातील राजधानीच्या ग्रीन झोनमध्ये आहे. याला सर्वाधिक सुरक्षित भाग समजले जाते. (फाइल)

नवी दिल्ली/काबूल - काबूल येथील भारतीय दुतावासवार रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. दुतावासाच्या सुरक्षेत तैनात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) यांच्या एका बॅरेकचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यात एकही जवान किंवा अधिकाऱ्याला इजा पोहोचलेली नाही. दुतावासातील अधिकारी, कर्मचारी सर्व सुरक्षित आहेत. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली आहे. 

 

ITBPची बिल्डिंग तीन मजली 
- काबूल येथील इंडियन अॅम्बेसीमध्ये आयटीबीपीचे अधिकारी आणि जवानांसाठी स्पेशल बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग तीन मजली आहे. 
- सोमवारी रात्री या बिल्डिंगच्या वरच्या भागावर एक रॉकेट येऊन धडकले. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूज एजन्सींच्या वृत्तानुसार, अशा प्रकारच्या रॉकेटचा वापर तालिबान दहशतवादी करत असतात. दहशतवाद्यांना असे रॉकेट हे पाकिस्तानी आर्मीच्या मदतीने मिळत असतात. 

 

सुषमांनी ट्विट करुन दिली माहिती
- केंद्रीय परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी रात्रीच फोनवरुन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करुन काबूलमधील भारतीय दुतावासावर रॉकेट हल्ला झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. 

- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, ITBP च्या पहिल्या बॅरेकवर रॉकेटने हल्ला झाला असून यामुळे भिंत तुटली आहे. मात्र अधिकारी-जवानांना यामुळे कोणतीही इजा झालेली नाही. अफगाणिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा या घटनेची तपासणी करत आहे.  
- रॉकेटचे टार्गेट चुकले की हल्ला जाणिवपूर्वक झाला, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. 
- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

आधीही झाले आहेत हल्ले 
- काबूलमधील भारतीय दुतावासावर याआधी मार्च 2017 मध्ये आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये 90 जणांचा मृत्यू झाला होता. 
- जलालाबादच्या इंडियन कॉन्स्यूलेटला 2016मध्ये लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये 9 स्थानिकांचा मृत्यू झाला होता. 
- काबूलमध्ये इंडियन कॉन्स्यूलेटवर 2008 आणि 2009 मध्येही हल्ला झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...