आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे पीएम मोदींचे आवडते भोजन आणि फोन, RTI मध्ये समोर आल्या गोपनीय गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी आयुष्य जाणून घेण्याची अनेकांना उत्सूकता आहे. त्यांना जेवणात काय आवडते, ते कोणत्या कंपनीचा फोन वापरतात, त्यांचे डेली रुटीन कसे असते? असे एक नाही तर अनेक प्रश्न माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारले गेले आहेत. काही खासगी प्रश्नांची उत्तरे देण्यात आली मात्र काही गोष्टी या गोपनीय असल्याचे कारण देत त्यांचे उत्तर देण्याचे टाळले आहे. 

 

कोण पाहाते पीएम मोदींचे सोशल अकाऊंट 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. त्यांच्याआधी देशाचे एकही पंतप्रधान सोशल मीडियावर एवढे अॅक्टिव्ह दिसलेले नाही. पीएम मोदी हे फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाहीत तर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे अनेकांना उत्सूकता  आहे की पंतप्रधान मोदी त्यांच्या व्यस्ती दिनक्रमातून सोशल मीडियासाठी केव्हा वेळ काढतात? किंवा त्यांचा सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी ते किती खर्च करतात?

 

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काहीही खर्च होत नाही. @PMOIndia नावाने असलेले ट्विटर अकाऊंट पीएमओ हँडल करते, तर @narendramodi या नावाने असलेले अकाऊंट ते स्वतः मॅनेज करतात. यासंबंधीचा सवाल आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विचारला होता. 

 

मोदी किती सुटी घेतात? 
- या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून एकही सुटी घेतलेली नाही. ते 19 महिन्यांपासून सतत काम करत आहेत. एका आरटीआयला दिलेल्या उत्तरात पीएमओने म्हटले, 'ही इज ऑन ड्यूटी ऑल द टाइम.'

 

जेवणात काय आवडते? 
- मोदींना भोजनामध्ये काय आवडते हा अनेकांच्या उत्सूकतेचा प्रश्न आहे. त्यांना व्हेज आवडते की नॉनव्हेज? एका आरटीआयला दिलेल्या उत्तरात पीएमओने सांगितले होते की मोदींना त्यांचे कुक बद्री मीणा यांनी तयार केलेली बाजरीची भाकरी आणि खिचडी पसंत आहे. ते नेहमी गुजराती जेवणाला पसंती देतात. 

 

किचनचा खर्च कोण करते? 
- मोदी त्यांचे शासकीय निवासस्थान 7 रेसकोर्स येथील किचनचे बील स्वतः देतात. जेवणाचा खर्च हा वैयक्तिक खर्च असल्याचे ते मानतात, असे उत्तर एका आरटीआयला पीएमओने दिले आहे. 

 

हा फोन वापरतात मोदी 
- मोदी कोणता फोन आणि इंटनेट वापरतात, याचीही नागरिकांना उत्सूकता आहे. या प्रश्नाच्या उत्तरात पीएमओने म्हटले आहे, की त्यांनी ऑफिसकडून कोणताही स्मार्टफोन घेतलेला नाही. मात्र ते आयफोन यूज करतात. तो त्यांचा पर्सनल आहे. मोदींच्या 7 रेसकोर्स येथील निवासस्थानी 34Mbps इंटरनेट स्पीड आहे. 

बातम्या आणखी आहेत...