आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा पीचवर सचिनचे खाते उघडलेच नाही; खा. सचिन भाषणासाठी प्रथमच उभारला, पण गोंधळात शब्दही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- क्रिकेटचा देवता असणाऱ्या सचिन तेंडुलकरला ५ वर्ष ९ महिन्यांपूर्वी राजसभेचे सदस्यत्व मिळाले. सचिन गुरूवारी पहिल्यांदा संसदेत बोलण्यासाठी १० मिनिटे उभा राहिला. परंतु काँग्रेसने केलेल्या गोंधळामुळे तो एक शब्दही उच्चारू शकला नाही. डॉ. मनमोहनसिंग यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून संसद सत्राच्या पहिल्या दिवसापासून निषेध केला जात निषेध केला जात आहे. या गोंधळातच सचिनला भाषण देता आले नाही. 


गुरूवारी राज्यसभेत अल्पकालीन चर्चेसाठी खासदार सचिनचे नाव नोंदवण्यात आले होते. देशातील खेळाचे भविष्य या विषयावर तो मत मांडणार होता. दोन वाजता तो संसदेत आला. १०३ क्रमांकाच्या जागेवर बसून भाषणासाठी नंबर येण्याची प्रतीक्षा करत होता. तो चिंतातुर अवस्थेत नखे चावत होता. एखादा वेगवान गोलंदाजाचा सामना करताना जशी तयारी केली जाते त्याप्रमाणे त्याने एक-दोन वेळा मानेला झटकाही दिला. त्याच दरम्यान विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्या जागी उभे राहून गोंधळ घालत होते. पंतप्रधानांनी माफी मागावी अशी त्यांची मागणी होती. २ वाजून ६ मिनिटांनी नावाची घोषणा झाल्यावर सचिन बोलण्यासाठी जागेवर उभा राहिला. परंतु काँग्रेस सदस्यांचा गोंधळ थांबला नाही. सभापती व्यंकय्या नायडू गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर रागावले. सचिन भारतरत्न असून त्याचे विचार ऐकण्यासाठी देशात उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वांनी शांत रहा, असे नायडू म्हणाले. 

 

 खासदार सचिन
- उपस्थिती : ८ टक्के
-  विचारलेले प्रश्न :  २२ (यापैकी ८ प्रश्न हे रेल्वे, तर २ प्रश्न युवक व क्रीडा विभागाशी संबंधित.) 
-  चर्चेत सहभाग : शून्य

 

भाषण ऐकण्यासाठी आलेली मुलेही निराश

भाषण देण्यापूर्वी सचिनची नजर प्रेक्षक गॅलरीत गेली. तेथे लाल ब्लेझरमधील गणवेशात असलेली शालेय मुले होती. सर्व मुले आवडत्या क्रिकेटरचे भाषण ऐकण्यासाठी आली होती. सचिन भाषणासाठी उभा राहिला तेव्हा घोषणा देऊ लागली. परंतु सचिनचे भाषणच झाले नाही, त्यामुळे मुळे निराश झाली.


राइट टू प्लेवर बोलणार होता सचिन 
- सचिन सभागृहात राइट टू प्ले आणि भारतातील खेळाचे भवितव्य या विषयावर बोलणार होता. त्यासाठी त्याला काँग्रेसचे सदस्य पीएल पुनिया आणि भाजपचे रणविजय सिंह जूदेव यांचा पाठिंबाही मिळाला. पण गोंधळामुळे त्यांचे भाष सुरुच होऊ शकले नाही. 
- व्यंकय्या नायडू यांनी सचिनचे भाषण सुरू व्हावे म्हणून आधी मेंबर्सना शांत राहण्याचे अपिल केले. पण सदस्य गोंधळ घालत राहिले. 


काय आहे राइट टू प्ले 
- संसदेत दिलेल्या नोटिसनुसार सचिन तेंडुलकरला राइट टू प्ले या विषयावर चर्चा करायची होती. 
- शिक्षणाबरोबरच खेळही अनिवार्य करायला हवा असे सचिनचे मत आहे. तसेच खेळासाठी आवश्यत सोयीसुविधाही सर्व मुलांसाठी उपलब्ध असाव्यात असेही सचिनला वाटते. तसा घटनात्मक अधिकार असावा अशी सचिनची इच्छा आहे. 


मोदींनीही खेळाच्या गरजेवर दिला होता जोर 
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनीही मुलांना स्पोर्ट्स आणि फिजिकल अॅक्टीव्हिटीजमध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. भारतीय मुलांच्या लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येमुळे मोदी चिंतीत होते. त्यामुळेच त्यांनी ही विनंती केली होती. 


दत्तक घेतलेल्या गावाला दिली भेट 
सचिन तेंडुलकरने नुकतीच महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील डोंजा गावाला भेट दिली आहे. खासदार आदर्श ग्राम योजनेत गावाचा विकास करण्यासाठी सचिनने हे गाव दत्तक घेतले आहे. सचिनने गावाला चार कोटींचा निधी दिला आहे. सचिन मंगळवारी येथे पोहोचला होता. 

बातम्या आणखी आहेत...