आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - क्रिकेट आयकॉन आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकरने निकृष्ट दर्जाचे हेल्मेट तयार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सचिनने केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना एक पत्रही लिहिले आहे. सुरक्षितपणे टू व्हिलर्स ड्रायव्हींगबाबतच्या अभियानांतर्गत सचिनने ही मागणी केली आहे.
सचिनने काय लिहिले पत्रात..
जेव्हा आपण मैदानात खेळायला जातो. त्यामुळे खेळाडू म्हणून आम्ही चांगल्या दर्जाचे सुरक्षिततेचे साहित्य किती गरजेचे आहे, त्याचे महत्त्व आम्हाला माहिती आहे. अशाच चांगल्या दर्जाचे हेल्मेट टू व्हिलर्स चालणाऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे.
70 टक्के दुचाकीस्वार वापरतात निकृष्ट दर्जाचे हेल्मेट
- मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत तेंडुलकरने म्हटले आहे की, भारतात 70 टक्के बाइक रायडर निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वापरतात.
- ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्याचे कारण म्हणजे, एकूण रस्ते अपघातांमध्ये 30 टक्के दुचाकीस्वारांचा समावेश असतो.
- दुचाकी चालवणाऱ्यांनी जर चांगल्या दर्जाचे हेल्मेट वापरले तर दुर्घटनेत हानी पोहोचणाऱ्या 42 टक्के लोकांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकते.
मंत्रालयाचे कौतुक
पत्रात सचिनने लिहिले, मला माहिती आहे की मंत्रालय लोकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सक्रिय आहे. त्यामुळे बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे हेल्मेट तयार करून त्यावर आयएसआयचा बनावट लोगो लावून लोकांचे जीव धोक्यात टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. कारण अपघाताच्या वेळी अशा हेल्मेटच्या मदतीने डोक्याला मार लागण्याचा धोका असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.