आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या तिमाहीत पुणे, मुंबईत घरे विक्रीत वाढ; ७ प्रमुख शहरांत 49,200 घरे विकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सात प्रमुख शहरांमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान घरांच्या विक्रीमध्ये त्या आधीच्या तिमाहीच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात अाली आहे. या दरम्यान या शहरांमध्ये ४९,२०० घरांची विक्री नोंदवण्यात आली आहे. या आधीच्या तिमाहीमध्ये या शहरांमध्ये ४३,८०० घरांची विक्री झाली होती. या सात शहरांमध्ये दिल्ली -एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांचा समावेश आहे.  


नवीन रिअल्टी कायदा रेरा लागू झाल्यानंतर शेवटच्या पातळीवरील ग्राहकांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे घरांच्या विक्रीत वाढ नोंदवण्यात आली असल्याचे मालमत्ता कन्सल्टंट संस्था “एनारॉक’च्या वतीने जाहीर अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये घरांचा पुरवठा २७ टक्क्यांनी वाढून ३३,३०० वर पोहोचला आहे. या आधीच्या तिमाहीचा विचार केल्यास हा आकडा २६,३०० वर होता, तर विक्री न झालेल्या घरांची संख्यादेखील घटली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या २ टक्क्यांच्या घटीसह ७.११ लाख राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...