आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांकाणी काळवीट शिकार प्रकरण: सलमानला जामीन मंजूर; 50 तासांनंतर मुक्तता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- अभिनेता सलमान खान शनिवारी जोधपूर तुरुंगातून जामिनावर सुटला. सुमारे ५० तास तुरुंगात राहिल्यानंतर संध्याकाळी सुटका होताच तो चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाला. कांकाणी काळवीट शिकार प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा झालेल्या सलमानला जिल्हा व सत्र न्यायाधीश (ग्रामीण) रवींद्रकुमार जोशी यांनी ५० हजार रुपयांचा वैयक्तिक मुचलका व दोन साक्षीदारांच्या २५-२५ हजारांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तथापि, सलमान खानला कोर्टाच्या परवानगीविना देश सोडून जाता येणार नाही. सत्र न्यायालयाने सीजेएम कोर्टाच्या निकालाविरुद्ध दाखल सलमानची याचिका मंजूर केली. त्यावर ७ मे रोजी सुनावणी होईल. या दिवशी सलमानला कोर्टात हजर राहावे लागेल.  तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला पाहण्यासाठी रस्त्यांवर गर्दी जमली हाेती. मुंबईत परतल्यानंतर त्याने घराच्या बाल्कनीतून चाहत्यांचे आभार मानले.

 

सलमानचे वकील : गोळी लागल्याचे स्पष्ट नाही  सरकारी वकील : प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तर आहेतच 

सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली झाल्याने जामिनावर सुनावणी होईल की नाही याबाबत साशंकता होती. परंतु सकाळी पावणेअकरा वाजता सुनावणी सुरू करण्यात आली. सलमानचे वकील महेश बोडा आणि हस्तीमल सारस्वत यांनी बाजू मांडताना म्हटले की, काळविटाचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे मेडिकल बोर्डाचे म्हणणे आहे. याच्या निश्चितीसाठी काळविटाचे कातडे आणि हाडांचे तुकडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगण्यात आले. वन विभागाने कातडीऐवजी केवळ हाडांचे तुकडे प्रयोगशाळेत पाठवले. अहवालात हाडांच्या तुकड्यांवरून गोळी लागल्याचे स्पष्ट होत नाही. अहवाल नकारात्मक आला तर आमच्या मताला काही महत्त्व नाही, असे डॉक्टरांनीही स्पष्ट केले आहे.  दुसरीकडे सरकारी वकील पोकरराम बिश्नोई म्हणाले की, हा एकमेव असा खटला आहे ज्यात साक्षीदार उपलब्ध आहेत. मुद्देमालही जप्त करण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सलमानच्या विरोधात एससी-एसटी कायद्यातंर्गत दोन खटले दाखल आहेत. अशा स्थितीत जामीन देऊ नये. सलमानच्या वकीलांनी म्हटले की, अपिलाच्या सुनावणीचा नंबर उशिराने येईल. इतक्या दिवसापर्यंत ते तुरुंगात कसे राहू शकतील. पहिलेही अनेक खटल्यांमध्ये उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 

 

कोर्टरूमध्ये काय झाले? 
- सलमानचे वकील महेश बोडा म्हणाले, 20 वर्षांपासून हा खटला सुरु असून सलमान जामीनावर बाहेर होता. त्याने नेहमीच कोर्टाचा आदर केला आहे, जेव्हा सांगितले तेव्हा सुनावणीला हजर झाला होता. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 
- त्यावर सरकारी वकील पोकरराम म्हणाले, की साक्षीदार आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टने स्पष्ट झाले आहे की सलमानने गोली मारुन काळविटांची शिकार केली. त्याच आधारावर ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले आहे. तेव्हा त्याला जामीन देऊ नये. 
- दुसरीकडे, बिश्नोई समाजाचे वकील महिपाल बिश्नोई म्हणाले, सलमानविरोधात आरोपी निश्चित झाले आहेत. त्यामुळे त्याच्या जामीनावर सुनावणी करण्याऐवजी तुरुंगात ठेवण्यावर लवकर सुनावणी केली पाहिजे. त्याच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. पुराव्यांच्या आधारावर यापुढेही त्याला दोषीच ठरवले जाईल. 

 

हेही वाचा,

राजस्थानमध्ये 87 न्यायाधीशांच्या रात्रीतून बदल्या

 

सलमानच्या वकीलांना अंडरवर्ल्डकडून धमकी 
- सलमानचे वकील महेश बोडा यांना अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीकडून धमक्या मिळत आहेत. बोडा यांनी सांगितले की गुरुवारी सायंकाळी इंटरनॅशनल कॉल आला, त्यांनी कॉल अटेंड केला नाही तर शुक्रवारी सकाळी 8 ते 10 मेसेज आले. रवी पूजारीच्या नावाने आलेल्या या मेसेजमध्ये म्हटले होते, की सलमानची केस सोडून द्या. अॅड. बोडा यांनी पोलिसात तक्रार केली आणि मेसेजचा तपशील पोलिसांना सोपवला. 
- अॅड. हस्तीमल सारस्वत यांनाही 3 इंटरनॅशनल कॉल आले. ते त्यांनी स्वीकारले नाही. त्यांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी त्यांनी कॉलचे नंबर तपासले तर ते पाकिस्तानातील होते. हस्तीमल यांनी सांगितले की गेल्या वर्षीही रवी पूजारीने त्यांना धमकी दिली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...