आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अलीगड - काँग्रेस नेते आणि माजी कायदे मंत्री सलमान खुर्शिद यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या वार्षिक उत्सवात सहभागी झालेल्या खुर्शिद यांना एका विद्यार्थ्याने अयोध्येतील वादग्रस्त ढांचा पाडणे आणि त्यानंतरच्या दंगलीवर प्रश्न विचारला होता. त्यावर खुर्शिद म्हणाले, 'काँग्रेसवर मुस्लिमांच्या रक्ताचे डाग आहे. तुम्ही (विद्यार्थ्यांनी) यातून शिकले पाहिजे.'
खुर्शिद म्हणाले, माझ्यावरही ते शिंतोडे उडाले आहे...
- अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) विद्यार्थ्याने खुर्शिद यांना सवाल केला, की 1948 मध्ये एएमयू अॅक्टमध्ये पहिले संशोधन झाले. त्यानंतर 1950 मध्ये राष्ट्रपतींचा आदेश आला, त्यामुळे मुस्लिमांचे आरक्षण काढून घेण्यात आले. त्यानंतर हाशिमपूरा, मलियाना आणि मुझफ्फरपूर सारख्या दंगली भडकल्या. याशिवाय बाबरी मशिदीची शहादत हे सर्व काँग्रेसच्या काळात झाले. मुस्लिमांच्या रक्ताचे डाग काँग्रेसवर उडाले ते तुम्ही कसे स्वच्छ करणार?
- यावर खुर्शिद म्हणाले, काँग्रेसवर मुस्लिमांच्या रक्ताचे डाग आहे. एवढे बोलूनच खुर्शिद थांबले नाही तर ते म्हणाले, मी काँग्रेस नेता असल्याने माझ्यावरही ते शिंतोडे उडाले आहेत. मात्र ते तुमच्यावर उडू नये यासाठी या घटनांमधून तुम्ही बोध घेतला पाहिजे.
चीफ जस्टीस महाभियोग प्रस्ताव प्रक्रियेत नव्हते खुर्शिद
- गेल्या काही दिवसांपासून खुर्शिद काँग्रेस पक्ष धोरणापासून वेगळे राहात असल्याचे दिसते. शुक्रवारी जेव्हा पक्षाने चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस दिली, तेव्हा खुर्शिद म्हणाले होते की मी या निर्णयात नाही. ते म्हणाले होते, फक्त सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि त्यांच्या दृष्टीकोणाशी सहमत नसल्याचे कारण देत महाभियोग चालवला जाऊ शकत नाही.
- महाभियोग हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगत खुर्शिद यांनी या प्रस्तावापासून स्वतःला दूर ठेवले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.