आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Samsung Plant Inaugration In Noida Narendra Modi And S Korean President Used Metro To Reach Plant

दक्षिण कोरियन राष्ट्राध्यांसह मेट्रोने नोएडाला पोहोचले मोदी; थोड्याच वेळात Samsung प्लांटचे उद्घाटन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन सोमवारी मेट्रोने नोएडाला पोहोचले. याच ठिकाणी ते सॅमसंगच्या सर्वात मोठ्या प्लांटचे उद्घाटन केले आहे. हा जगातील सर्वात मोठा मोबाईल मॅनुफॅक्चरिंग प्लांट असेल असा कंपनीचा दावा आहे. नोएडाच्या सेक्टर 81 मध्ये होणारा हा प्रकल्प 35 एकरमध्ये पसरला आहे. तसेच या प्रकल्पासाठी 5 हजार कोटी रुपयांचा खर्च होत आहे. सद्यस्थितीला कंपनी भारतात 6.7 कोटी स्मार्टफोन निर्मिती करत आहे. हे नवीन प्रकल्प सुरू झाल्यास ही आकडेवारी दुप्पट होणार आहे. 

 

मून यांचा पहिला भारत दौरा
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून रविवारी दिल्लीत पोहोचले. राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत पत्नी किम जुंग-सुक, कॅबिनेटचे वरिष्ठ सदस्य, अधिकारी आणि 100 उद्योजकांचा समूह देखील आला आहे. सॅमसंग प्लांटच्या उद्घाटनापूर्वी मून भारत-कोरिया बिझनेस फोरमच्या बैठकीत सहभागी होतील. यानंतर पीएम मोदींसोबत गांधी मेमोरियलला भेट देतील. 10 जुलै रोजी राष्ट्रपती भवनमधअये त्यांचे औपचारिक स्वागत केले जाणार आहे. यानंतर ते हैदराबाद हाउसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या भेटीत संरक्षण क्षेत्रासह, सायबर सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा केली जाईल. सोबतच, जागतिक शांतता आणि औद्योगिक मुद्यावर करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


1990 मध्ये देशात कंपनीच्या पहिल्या युनिटची सुरुवात
सध्या भारतात सॅमसंग मॅनुफॅक्चरिंगचे दोन प्लांट आहेत. त्यापैकी एक नोएडा तर दुसरे श्रीपेरुंबदूर येथे आहे. सोबतच कंपनीने भारतात पाच रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट सेंटर देखील उघडले आहेत. देशभर कंपनीचे 1.5 लाख रीटेल आउटलेट आहेत. 2016-17 मध्ये या कंपनीचे मोबाईल बिझनेस रेव्हेन्यू 34,400 कोटी रुपये आणि विक्री 50,000 कोटी इतकी राहिली आहे. सॅमसंग देशात 70 हजार लोकांना रोजगार दिला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...