आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार सपना चौधरी; मिळाली नाही राहुल, सोनिया यांची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हरियाणवी लोक कलाकार आणि बिग बॉस फेम सपना चौधरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेससाठी प्रचार करणार असे जवळपास निश्चित झाले आहे. सपना चौधरी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचली होती. परंतु, या दोन्ही नेत्यांशी तिची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे, तिने राहुल आणि सोनिया यांना भेटीसाठी पुन्हा वेळ मागितला आहे. 


काय म्हणाली सपना...
"सोनिया गांधी आणि काँग्रेसने देशासाठी खूप कामे केली आहेत. मी त्यांच्या कामांमुळे अतिशय प्रभावित झाले. त्यामुळे, त्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते. या भेटीमागे दुसरा कुठलाही हेतू नाही. भेटीनंतरच मी या विषयी सविस्तर बोलू शकते. मी काँग्रेसच्या प्रचारासाठी तयार आहे." असे सपना चौधरीने सांगितले आहे. ती पुढे म्हणाली, "प्रत्येकाच्या आयुष्यात वाइट काळ येतो. परंतु, संधी मिळाल्यास ती सोडू नये." तर दुसरीकडे, काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितल्याप्रमाणे, तिने काँग्रेसच्या इतर काही नेत्यांची भेट घेतली आहे. 


आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न...
हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी आणि वाद यांचे जुने नाते आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये एका वादग्रस्त गाण्यामुळे ती चर्चेत आली होती. तिच्या विरोधात जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचे आरोप लागले होते. जुलै 2016 मध्ये तिच्या विरोधात एससी/एसटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये तिने विष प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सपना चौधरीने रियालिटी शो बिगबॉस-11 मध्ये सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली.

बातम्या आणखी आहेत...