आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- ‘पीपली लाइव्ह’चा सहदिग्दर्शक महमूद फारुखी याची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्याच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आरोप करणाऱ्या महिलेने घटनेस बराच कालावधी उलटून गेल्यानंतर एका ई-मेलद्वारे फारुखीला ‘आय लव्ह यू’ असे म्हटले होते. बलात्कारानंतर पीडितेने आरोपीला आय लव्ह यू म्हटले, अशी किती प्रकरणे तुम्ही पाहिली आहेत, अशी विचारणा न्यायालयाने महिलेच्या वकिलास केली. त्यावर महिलेच्या वकिलासही समाधानकारक उत्तर देता आले नाही.
अमेरिकेतील विद्यापीठात संशोधन करत असलेल्या एका महिलेने फारुखीने मार्च २०१५ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सत्र न्यायालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये फारुखीला सात वर्षांची शिक्षा ठोठावली. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने त्यास सप्टेंबर २०१७ मध्ये निर्दाेष मुक्तता केली. त्या महिलेने उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
शुक्रवारी न्या. एस. ए. बोबडे आणि एल. एन. राव यांच्या पीठासमोर महिलेच्या वकिलाने म्हटले, फारुखीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सहमतीने संबंध असल्याचा नवा युक्तिवाद केला होता. यावर सत्र न्यायालयात युक्तिवाद झालाच नव्हता. तथापि, न्यायालयाने म्हटले, फारुखी व महिला एकमेकांना चांगले ओळखत होते. हा गुंतागुंतीचा खटला आहे. पण उच्च न्यायालयाने चांगला निर्णय दिला होता. यात आम्ही काही फेरबदल करणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.