आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खाते, मोबाइल नंबरला ‘आधार’ जोडण्यास मुदतवाढ, निकाल येईपर्यंत मुदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बँक खाते, मोबाइल क्रमांक, पासपोर्टसारख्या सुविधा आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी वाढवली. आता ३१ मार्चपर्यंत आधार लिंक बंधनकारक नसेल.

 

याबाबतची पुढील मुदत घटनापीठाच्या निकालानंतर निश्चित होईल. पासपोर्टसाठी आधार सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला. त्यामुळे सरकार तूर्त तत्काळ पासपोर्टसाठीही आधार सक्तीचे करू शकणार नाही. मात्र, सरकारी योजनांच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अजूनही आधार आवश्यक राहील.

 

सबसिडीला आधार सक्तीचे

सुप्रीम कोर्ट म्हणाले, सबसिडी असलेल्या योजनांवर हा आदेश लागू होणार नाही. म्हणजेच रेशनसह थेट खात्यात अनुदान योजनांना आधार क्रमांक देणे बंधनकारक असेल.

 

निर्णय घटनापीठाकडेच

७ मार्चला घटनापीठ म्हणाले, आधारच्या वैधतेवर ३१ मार्चआधी निकाल देणे शक्य नाही. शेवटच्या क्षणी निर्णय दिल्यास अडचणी येतील. आता आधार कार्डच्या घटनात्मकतेवर घटनापीठच निर्णय घेईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...