आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही कचरा वेचणारे नाही : सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर केंद्राच्या 845 पानी प्रतित्रापत्रावर SC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
SC ने हे प्रतिज्ञापत्र ऑन रेकॉर्ड घेण्यास मनाई केली. - Divya Marathi
SC ने हे प्रतिज्ञापत्र ऑन रेकॉर्ड घेण्यास मनाई केली.

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबाबत अर्धवट माहिती दिल्याच्या कारणावरून फटकारले. केंद्राने देशभरात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची माहिती 845 पानांच्या प्रतिज्ञापत्रात दिली. पण तीही अर्धवट होती. SC ने हे प्रतिज्ञापत्र ऑन रेकॉर्ड घेण्यास मनाई केली. सरकारने आमच्यासमोर कचरा फेकू नये असे सरकारने म्हटले. 


सुप्रीम कोर्टाने आणखी काय म्हटले..

1) आम्ही हे स्वीकारू शकत नाही 
- जस्टिस मदन बी लोकूर आणि जस्टीस दीपक गुप्ता यांच्या बेंचने म्हटले, तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात? तुम्ही आम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात? पण आम्ही प्रभावित झालो नाही. तुम्हीला सर्वकाही आमच्यासमोर मांडयाचे आहे. आम्ही हे स्वीकारणार नाही. 

2) आमच्यासमोर कचरा फेकू नका 
- बेंचने म्हटले, असे करू नका. तुमच्याकडे काहीही कचरा असला तर तुम्ही तो आमच्यासमोर फेकता. आम्ही कचरा गोळा करणारे नाही. याबाबत काहीही संशय बाळगू नका. 

3) प्रतिज्ञापत्रात काहीच नाही, तर ते सादर करण्यात काय अर्थ?
- जर प्रतिज्ञापत्रात काहीही नसेल तर ते फाईल करण्यात काय अर्थ आहे. आम्ही ते ऑन रेकॉर्ड घेऊ शकत नाही. तुम्ही ते पाहिले नाही आणि आम्ही ते पाहावे असे तुम्हाला वाटते. 


SC ने काय निर्देश दिले होते? 
सुप्रीम कोर्टाने केंद्राला म्हटले होते, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 च्या प्रॉव्हीजन्सच्या आधारे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी राज्य पातळीवरील सल्लागार मंडळे स्थापन केली की नाही याची माहिती तीन आठवड्यांत सादर करावी. त्यात मंडळ स्थापन केल्याची तारीख, मंडळातील सदस्यांची नावे आणि एखादी मिटींग झालेली असेल तर त्याची माहितीही द्यावी. 


सुप्रीम कोर्टाने का फटकारले.. 
- केंद्राच्या वकिलांनी 845 पानांचे प्रतिज्ञापत्र फाइल केले. पण जेव्हा पीठाने काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांना उत्तर देता आले नाही. 
- केंद्राच्या वकिलांनी म्हटले, आम्ही 22 राज्यांमधून माहिती गोळा केली आहे. त्यानंतर कोर्टाने त्यावर म्हणणे मांडले. 

बातम्या आणखी आहेत...