आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोएडा : 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, दोन शिक्षकांवर केला अत्याचाराचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचाराने त्रस्त झालेल्य नववीच्या एका विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी फाशी घेत आत्महत्या केली. इकिशा शाह (16) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मयूर विहारमधील एल्कॉन स्कूल मध्ये शिकत होती. तर नोएडा सेक्टर-52 मध्ये तिचे घर होते. तिचे वडील राघव शाह हे प्रसिद्ध कथक डान्सर आणि बिरजू महाराज यांचे शिष्य आहेत. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुलगी अनेक दिवसांपासून नैराश्यात होती. दोन शिक्षक तिला तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात आणि तक्रार केल्यास नापास करण्याची धमकी देतात, असे तिने अनेकदा सांगितले होते. आरोपी शिक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


वडिलांचा आरोप.. शिक्षक करत होते छळ 
- मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, शिक्षक एकांतामध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते असे मुलीने त्यांना सांगितले होते. दोघे तिला नापास करण्याची धमकीही देत होते आणि तसेच झाले. वडील तिला सांगायचे की, बेटा शिक्षक गुरू असतात. तरीही त्यांच्यापासून जरा लांबच राहा. माझ्या मुलीला सात मार्क्स दिले आहेत. शाळेचे प्रिन्सिपलही मुलीशी व्यवस्थित बोलत नव्हते. 
- तीन दिवसांपूर्वी माझी मुलगी शाळेतील एका मुलाकडे सायन्सचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. ती मला म्हणाली, मी सायन्समध्ये तर पास होईल, पण एसएसटी वाले मला नापास करतील. मला सकाळी मुलीला म्हणालो होतो की, तू चांगला अभ्यास कर, मी जातोय. फाशी घेण्यापूर्वी मी मेट्रोत असताना मुलीचा फोन आला होता. माझ्यासाठी कपडे आणताय का असे तिने विचारले होते. 


दोन विषयांत मिळाले होते कमी गुण 
इकिशाचा निकाल 16 मार्चला लागला होता. सायन्स आणि आणखी एका विषयात कंपार्टमेंट (सप्लिमेंट्री) मिळाले होते. कमी मार्क मिळाल्याने शिक्षकांनी इकिशाला रागावले होते. त्यामुळे ती तणावात होती. त्याच दिवसापासून ती वडिलांकडून म्हणजे राघव शाह यांच्याकडून कथ्थक शिकण्यातही लक्ष देत नव्हती. 

शिक्षकांवर गुन्हा दाखल 
- नोएडा सिटी एसपी अरुण सिंह यांच्यामते, मुलीबरोबर शाळेतील दोन शिक्षक छेडछाड करत होते आणि तिला मुद्दाम नापास केले अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी केली होती. 
- पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या विरोधात 306, 506 आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या खटल्याचा तपास सुरू आहे. 


मुलगी नापास झाली नव्हती : प्रिंसिपल
दुसरीकडे शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र गोयल यांनी म्हटले की, ही दुःखद घटना आहे. आमची शाळा चाइल्ड फ्रेंडली आहे. शाळा सीबीएसईच्या प्रमोशन पॉलिसीनुसार चालते. मृत विद्यार्थिनी फेल झाली नव्हती. तर तिची री-टेस्ट आली होती. आम्ही तपास संस्था आणि कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...