आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हांचे भाजपला चिमटे, \'मित्रों\' चा उल्लेख करत डागली तोफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशसह बिहार पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला आत्मविश्वास नडला अशी प्रांजळ कबुली दिली. या पराभवानंतर विरोधकांबरोबरच भाजपचे काही नेतेही चिमटे काढत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. शत्रुघ्न सिन्हा यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्यांनी ट्वीटद्वारे 'मित्रों' असा उल्लेख करत मोदींवर थेट हल्लाच चढवला असे म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे त्यांनी ट्रम्पचा उल्लेखही ट्वीटमध्ये केला. 


काय म्हणाले सिन्हा..
- शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्वीटमध्ये म्हटले .. मी नेहमी असे म्हटले आहे की, अहंकार, शीघ्रकोपीपणा आणि अति आत्मविश्वास हे लोकशाही राजकारणाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. मग ते ट्रम्पच्या बाबतीत असो, मित्रों असो किंवा विरोधी पक्षातील नेते असो...

- दुसऱ्या ट्वीटमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचे लिहिले. स्वतःच्यात घरच्या मैदानात पराभूत झाल्याने त्यांच्याबद्दल वाईट वाटत आहे. पण अति आत्मविश्वासामुळेच एवढा मोठा पराभव झाला हे त्यांनी खरे म्हटल्याचे सिन्हा यांनी ट्वीटमध्ये म्हटले.