आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींवर का भडकल्या या महिला, विचारले- \'ना खाऊंगा ना खाने दुंगा\'चे काय झाले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी विदेशात फरार झाल्यावरुन शिवसेनेने पीएम मोदींवर टीका केली आहे. - Divya Marathi
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी विदेशात फरार झाल्यावरुन शिवसेनेने पीएम मोदींवर टीका केली आहे.

नवी दिल्ली - मोदीजींनी स्वप्न दाखवले होते 'ना खाऊंगा ना खाने दुंगा', मात्र जनतेचा त्यांच्यावरुन विश्वास उडत चालला असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. एनडीए सदस्य शिवसेनेने नीरव मोदीवरुन मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मोदी सरकारला सवाल केला आहे, की सध्या देशात काय सुरु आहे? सामान्य व्यक्ती बँकेत पैसे ठेवण्यास घाबरत आहे. 

 

- हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चूना लावला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत बँकेचे शेअर्स कोसळले आहे. ठेवीदारही हवालदिल झाले आहे. 
- पंजाब नॅशनल बँकेच्या एलओयूच्या आधारे नीरव मोदीने बँकेच्या हाँगकाँग शाखेतून 11 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. 
- याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी सीबीआय आणि ईडीकडे करण्यात आल्यानंतर नीरव मोदी त्याची पत्नी एमी, भाऊ निशल आणि मेहुल चौकसी फरार झाले आहेत. 
- मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणूकीत 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' असे आश्वासन दिले होते. नीरव मोदीवरुन आता शिवसेनेने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. 
- शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या, 'मोदीजींनी स्वप्न दाखवले होते 'ना खाऊंगा ना खाने दुंगा'. यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदान केले. परंतू सध्या देशात काय सुरु आहे? सामान्य माणूस बँकेत पैसे ठेवायला घाबरत आहेत. ललित मोदी, नीरव मोदी, विजय माल्यासारखे लोक कोट्यवधींचा घोटाळा करुन सरकारच्या डोळ्या देखत देश सोडून निघून गेले. आणि सरकारने काहीही केले नाही.'

- दुसरीकडे ट्विटरवरही शिवसेना - भाजप यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...