आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shopian Firing Sc Says No Probe Would Be Initiated Against Major Aditya Till The Next Hearing

शोपियां फायरिंग: पुढील सुनावणीपर्यंत मेजर आदित्यविरोधात तपास होऊ शकत नाही- SC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोपियां फायरिंग प्रकरणात आर्मीने दगडफेक करणाऱ्यांविरोधात काऊंटर FIR दाखल केला होता. (फाइल) - Divya Marathi
शोपियां फायरिंग प्रकरणात आर्मीने दगडफेक करणाऱ्यांविरोधात काऊंटर FIR दाखल केला होता. (फाइल)

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने शोफियां फायरिंग केसमध्ये सोमवारी स्पष्ट केले की पुढील सुनावणीपर्यंत मेजर आदित्य यांच्याविरोधात चौकशी सुरु होऊ शकत नाही. शोपियां फायरिंग प्रकरणात लष्कराने दगडफेक करणाऱ्यांविरोधात काऊंटर FIR दाखल केला होता. त्याआधी पोलिसांनी मेजर आदित्य आणि त्यांच्या यूनिट विरोधात एफआयआर दाखल केला होता. 9 फेब्रुवारी रोजी मेजर आदित्य यांचे वडील लेफ्टनंट कर्नल करमवीरसिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.   

 

प्रश्नोत्तरातून जाणून घ्या शोपियां फायरिंग प्रकरण

 

Q. काय आहे शोपियां फायरिंग प्रकरण?
A - 27 जानेवारी रोजी आर्मीचा ताफा शोपियां येथील गनोवपोरा गावातून चालला होता. यावेळी आंदोलकांनी आर्मीच्या ताफ्यावर दगडफेक सुरु केली. प्रत्युत्तरात आर्मीने काही राऊंड फायर केले, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

Q. मग काय झाले?
A - शोपियां फायरिंग घटनेनंतर आर्मी ऑफिसरवर FIR दाखल करण्याचे आदेश महबूबा मुफ्ती सरकारने जम्मू-काश्मीर पोलिसांना दिले. 
- पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये आर्मी मेजर आदित्यकुमार यांचे नाव आहे.

Q. कोणी दाखल केली सुप्रीम कोर्टात याचिका?
A - मेजर आदित्यकुमार यांचे वडील कर्नल कर्मवीरसिंह यांनी FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. त्यांचे म्हणणे आहे, की मुलाने (मेजर आदित्यकुमार) सैनिकांना वाचवण्यासाठी फायरिंग केली. त्यामध्ये चुकीचे असे काही नव्हते.

Q. याचिकेत काय म्हणाले मेजर आदित्यकुमार यांचे वडील?
A - सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत कर्नल कर्मवीरसिंह म्हणाले, 'माझा मुलगा मेजर आदित्यकुमार त्याच्या सहकाऱ्यांसह तणावग्रस्त भागातून जात होता. यावेळी त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांना अनेकदा आवाहन करण्यात आले, आर्मीला नुकसान करु नका असेही सांगण्यात आले. आर्मीसाठी रस्ता मोकळा करण्याचे दगडफेक करणाऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. तरीही ते बाजूला झाले नाही. एफआयआरमध्ये मेजरचे नाव हे बदल्याच्या भावनेने टाकण्यात आले आहे.'
- याचिकेत म्हटल्यानुसार, रस्त्यावर बेकायदेशीर जमाव झाला होता. तो अतिशय उग्र होता. त्यांनी एका जेसीओला बेदम मारहाण करुन मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी फायरिंग करण्यात आले होते.

Q. आर्मीने या प्रकरणात काय म्हटले?
A- आर्मीच्या वतीने सांगण्यात आले होते की गढवाल युनिटच्या ज्या मेजरविरोधात पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न हे गुन्हे दाखल केले आहे ते मेजर घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर दूर होते. 
- पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर आर्मीने शोपियां येथे दगडफेक करणाऱ्यांवर FIR दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...