आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुताई, ऊर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार; केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने पुरस्‍कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अनाथाची माता सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या मुंबईतील संस्थेच्या अध्यक्षा ऊर्मिला बळवंत आपटे यांची २०१७ या वर्षीच्या ‘नारी शक्ती’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने महिला दिनानिमित्त दरवर्षी  राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात.  सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले आयुष्य व्यतीत करून शेकडो अनाथांना आईची माया दिली. ‘भारतीय स्त्री शक्ती’च्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या अापटे यांच्या याेगदानाचाही सरकारने गाैरव केला. ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि  शारीरिक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसूत्रीवर मोहीम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून सपुदेशनाचे  कार्य करते.
बातम्या आणखी आहेत...