आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआययूडीएफपेक्षा भाजपची आसाममध्ये अडीच पट वाढ; लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी आसाममध्ये बांगलादेशवासीयांची घुसखोरी आणि एआययूडीएफच्या विकासावर दिलेल्या वक्तव्यावर राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले की, त्यांनी अशी वक्तव्ये टाळायला हवीत, हे त्यांचे काम नाही. दुसरीकडे लष्कराने रावत यांच्या वक्तव्याचा बचाव करताना म्हटले की, त्यांच्या वक्तव्यात राजकीय किंवा धार्मिक टिप्पणी नाही. त्यांनी ईशान्येवर आयोजित परिसंवादात फक्त विकास आणि एकीकरणाचा मुद्दा मांडला. 

 

 काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह म्हणाले की, लष्करप्रमुखांनी असे वक्तव्य करायला नको होते. समस्यांचे राजकारण होऊ नये. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रावत यांनी समस्येची माहिती दिली आहे. त्यावर वाद होऊ नये. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, लष्करप्रमुखाला एखाद्या पक्षाच्या वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हक्क नाही.   पाच वर्षांत आसाममध्ये भाजपचा जनाधार एआययूडीएफच्या तुलनेत अडीच पट वेगाने वाढला आहे.

 

 

भाजपचे आसाममध्ये ६०, तर एआययूडीएफचे १३ आमदार   

> आसाममध्ये भाजपने प्रथम १९८५ मध्ये ३७ जागा लढवल्या होत्या. एकही जागा मिळाली नव्हती. १.०७% मते मिळाली.   
> एआययूडीएफ राज्यात प्रथम २०११ मध्ये ७८ जागा लढवल्या. १८ जागा आणि १२.५७% मते मिळाली होती.   
> २०११ मध्ये भाजपला  ५ जागा मिळाल्या होत्या. २०१६ मध्ये  भाजपने ८९ जागा लढवल्या. ६० जागा , २९.५१% मते मिळाली.   
> एआययूडीएफने २०१६ मध्ये ७४ जागा लढवल्या. १३ जागा. १३.०५% मते. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागा आहेत.   

 

शेजारी देशाला छुपे युद्ध हवे : रावत   

 

ईशान्येकडे सीमा सुरक्षेबाबत बुधवारी दिल्लीत झालेल्या चर्चासत्रात लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले की, आसाममध्ये एआययूडीएफ हा एक पक्ष आहे. तेथे त्याची वाढ भाजपपेक्षाही वेगाने झाली आहे. भाजपला १९८४ मध्ये २ जागा होत्या. आता तो पक्ष येथपर्यंत आला आहे. काही भागात निर्वासितांची संख्या वाढलीे.  निर्वासितांचे कारण आमचा पश्चिमेकडील शेजारी (पाक) आहे. त्याला छुपे युद्ध करायचे आहे.  

 

वक्तव्य- जनरल यांचे वक्तव्य घटनाविरोधी : अजमल

 

एआययूडीएफप्रमुख एम. बद्रुद्दीन अजमल म्हणाले, जनरल रावत यांनी राजकीय वक्तव्य केले आहे. मोठ्या पक्षांच्या कुशासनामुळेच एआययूडीएफ व आम आदमी पार्टीसारखे पक्ष वाढले आहेत. त्यांच्याविषयी बोलणे घटनाविरोधी आहे. अजमल धुबरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पक्षाचे ३ खासदार आहेत. अजमल यांनी २००५ मध्ये एआययूडीएफची स्थापना केली होती.

 

 

मुद्दा- आसाममध्ये अवैध पद्धतीने ५० लाख बांगलादेशी

 

आसाममध्ये सुमारे ५० लाख बांगलादेशी बेकायदेशीर राहत आहेत. ही कोणत्याही देशातील स्थलांतरित रहिवाशांपेक्षा सर्वात जास्त संख्या आहे. भाजपने २०१६ विधानसभा निवडणुकीत हा निवडणूक मुद्दा बनवला होता. भाजपचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी घुसखाेरांची ओळख पटवण्यासाठी एनआरसीपेक्षा भिन्न डिटेक्ट, डिलिट व डिपोर्ट कार्यक्रम सुरू केला. या कामात १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

 

 

वास्तव- ५१ वर्षांत २९ हजार बांगलादेशी परत

- सरकारनुसार, ५१ वर्षांत २९,७३८ बांगलादेशींना परत पाठवले आहे.
- १९७१ नंतर आतापर्यंत ८० हजार घुसखोरांची ओळख पटली आहे.
- तीन वर्षांत राज्याच्या ३.८९ कोटी लाेकांनी ६.५ कोटी दस्तऐवज पाठवले.
- जानेवारीत जारी एनआरसीच्या डेटामध्ये १.९ कोटी वैध नागरिक आढळले होते.
- बांगलादेशला आसामचे ४,०९६ किमी लांब सीमा क्षेत्र लागून आहे.

 

 

 


आर्मीने रावत यांचे वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले 
- वाद वाढल्यानंतर आर्मीने बिपिन रावत यांचे वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले आहे. आर्मीने म्हटले आहे की त्यांचे वक्तव्य राजकीय नाही किंवा कोणत्याही धर्मा संबंधी नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि भाजपने म्हटले आहे की कोणत्याही पक्षाने लष्कर प्रमुखांच्या वक्तव्यावर राजकारण करु नये. 
- अखिलेश प्रतापसिंह म्हणाले, लष्करावर टीका झाली नाही पाहिजे. ओवेसी हे विनाकरण बोलत असतात. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले आहे, की आर्मी चीफने समस्येबद्दल माहिती दिली आहे. त्यावर वाद करु नये. 

 

ओवेसी म्हणाले- त्यांनी अशा वक्तव्यापासून दूर राहिले पाहिजे
- एमआयएम नेते ओवेसींनी लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. ते म्हणाले, 'आर्मी चीफ यांनी एखाद्या राजकीय पक्षाविषयी बोलणे किंवा त्याच्या विकासाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार भारतीय लोकशाही आणि संविधान देत नाही. त्यांनी अशा वक्तव्यापासून दूर राहिले पाहिजे.'

बातम्या आणखी आहेत...