Home | National | Delhi | Skymet Weather, Monsoon 2018 is likely to remain normal

राज्याला दुष्काळाची धास्ती नाही; मराठवाड्यात पाऊस सरासरी गाठणार, देशात 100% मान्सून

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 05, 2018, 12:41 AM IST

कृषी आणि उद्योगजगतासाठी दिलासादायक बातमी आहे. देशात यंदा दुष्काळाची शक्यता नाही. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने यंद

 • Skymet Weather, Monsoon 2018 is likely to remain normal

  नवी दिल्ली/औरंगाबाद- कृषी आणि उद्योगजगतासाठी दिलासादायक बातमी आहे. देशात यंदा दुष्काळाची शक्यता नाही. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाबाबतचा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज बुधवारी जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा सरासरीइतका (१०० टक्के) पाऊस होणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातही यंदा चांगला पाऊस होईल, असे या अंदाजात स्पष्ट केले आहे. स्कायमेटनुसार देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) १००% पाऊस पडू शकतो. तथापि, यात पाच टक्क्यांची घट-वाढ होऊ शकते. एलपीएमध्ये ८८७ मिमी पाऊस असतो. सरासरीइतक्या पावसामुळे कृषी व उद्योग जगताला फायदा मिळेल. त्याचा थेट परिणाम जीडीपीवर होत असतो. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जास्त पावसाचीही शक्यताही २०% आहे. तथापि, द. द्वीपकल्प व पूर्वोत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यंदा मान्सून वेळेवर येण्याची आशा आहे. भारतीय हवामान खातेही लवकरच आपल अंदाज जाहीर करणार आहे. गतवर्षीच्या मान्सूनमध्ये ८४१ मिमी पाऊस झाला होता. तो सरासरीपेक्षा ५% कमी आहे. देशातील ९१ मोठ्या जलाशयांत पाण्याची पातळी ३६ टक्क्यांपर्यंत आली आहे.


  - देशात १००% मान्सून : खासगी संस्था स्कायमेटने जारी केला पहिला अंदाज
  - मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादेत सरासरी -पेक्षा जास्त पाऊस होणार
  - दक्षिण व पूर्वोत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शंका
  - १००% पाऊस म्हणजे ८८७ मिमी एलपीए इतका


  जूनमध्ये सर्वाधिक ऑगस्टमध्ये कमी
  जून व सप्टेंबरमध्ये बहुतांशी भागात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे. जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडेल. जूनमध्ये एलपीएच्या १११%, जुलैमध्ये ९७%, ऑगस्टमध्ये ९६% आणि सप्टेंबरमध्ये १०१% पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


  नकारात्मक परिणाम नाही
  स्कायमेटच्या अंदाजानुसार ला नीना कमकुवत असल्याने आणि प्रशांत महासागरावरील तापमान वाढल्याने साधारण किंवा जास्त पावसाची शक्यता कमी असते. याशिवाय नीनो इंडेक्स आणि आयओडीनेही मान्सूनवर काही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.


  उत्तर मराठवाड्यात जास्त पाऊस
  स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यंदा पाऊस सरासरीइतका होईल. मराठवाडा व विदर्भात जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होईल. विशेषत: उत्तर मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, भोपाळ, इंदूर, जबलपूर या शहरांत सरासरीहून जास्त पावसाची शक्यता आहे, तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत येथे सरासरीइतका पावसाचा अंदाज आहे.


  देशभरात इतर ठिकाणी
  उत्तर भारतात अनेक जागी सरासरीहून जास्त वा अतिवृष्टीचीही शक्यता आहे. मध्य भारतातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. दक्षिण भारतात मात्र पाऊस सरासरीहून कमी बरसू शकतो.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, गतवर्षी तंतोतंत खरा ठरला स्कायमेटचा अंदाज...

 • Skymet Weather, Monsoon 2018 is likely to remain normal
 • Skymet Weather, Monsoon 2018 is likely to remain normal

Trending