आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक: फीस भरली नाही म्हणून 59 लहान मुलींना 5 तास बेसमेंटमध्ये कोंडले, टॉयलेटलाही जाऊ दिले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
59 लहानग्या मुलींना शाळेच्या बेसमेंटमध्ये ठेवण्यात आले.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, मुलींना पाणीसुद्धा पिऊ दिले नाही.

 

नवी दिल्ली - राजधानीतील राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलने सोमवारी फीस भरली नाही म्हणून 5 ते 8 वर्षे वयाच्या 59 चिमुरड्या मुलींना बेसमेंटमध्ये 5 तासांपर्यंत बंद ठेवले. ही घटना मंगळवारी समोर आली. पालकांनी सांगितले की, दुपारी 12.30 वाजता जेव्हा मुलांना घेण्यासाठी आम्ही पोहोचलो, तेव्हा कळले की एकूण 59 मुली वर्गातच नव्हत्या. शिक्षकांना विचारल्यावर कळले की, फीस न भरल्याने मुलींची हजेरी लावण्यात आली नाही. त्यांना बेसमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. शाळेच्या हेड मिस्ट्रेस फराह दिबा खान यांच्या सांगण्यावरून असे करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पालकांच्या मते, सर्व मुली बेसमेंटमध्ये जमिनीवर बसलेल्या आढळल्या. तेथे पंखासुद्धा नव्हता. सर्व जणी गरमी आणि तहान-भुकेने व्याकूळ झाल्या होत्या. पालकांनी जेव्हा एच. एम. फराह खान यांना तक्रार केली, तेव्हा त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. खान म्हणाल्या, फीस जमा न करणाऱ्या मुलांना येथे ठेवण्यात आले आहे. पालकांचे म्हणणे आहे की, आम्ही सप्टेंबरपर्यंत फीस जमा केली होती. एका चिमुरडीच्या आईवडिलांनी मीडियाला चेकही दाखवला. दुसरीकडे, शाळा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे की, हे काही तळघर (बेसमेंट) नाहीये, तर अॅक्टिव्हिटी रूम आहे. येथे हवा आणि लाइटची व्यवस्था आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...