आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon केरळमध्‍ये: स्कायमेट; हवामान खात्याचा अंदाज: 24 तासांत येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी मान्सून दाखल होत असल्याचे म्हटले जाते. - Divya Marathi
मंगळवारी मान्सून दाखल होत असल्याचे म्हटले जाते.

औरंगाबाद - नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून केरळात दाखल झाल्याचा दावा सोमवारी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने केला आहे. तर मान्सून केरळात येण्यासाठी आणखी २४ तास लागतील, असे मत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केले आहे.

 

मान्सून आमच्याच अंदाजानुसार वाटचाल करतो आहे, या श्रेयावरून या दोन   हवामान संस्थांत जुंपली आहे. स्कायमेटच्या मते, भारतीय उपखंडात मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण करत २८ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला आहे. सर्वसाधारणपणे केरळात १ जून रोजी मान्सून येतो.

 

 

स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांच्या मते, मान्सून केरळात दाखल होण्यासाठी १४ केंद्रांवरील पूर्वमोसमी पाऊस, मोसमी वारे आणि दीर्घलहरींचे उत्सर्जन हे सर्व निकष पूर्ण करत नैऋत्य मोसमी पावसाच्या भारतातील हंगामाला सुरुवात झाली आहे. आयएमडीने मात्र याचा इन्कार केला आहे. आयएमडीने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सून केरळात पोहोचण्यासाठी मंगळवार २९ मेपर्यंत वाट पाहावी लागेल.

 

लातूर-उस्मानाबादेत पाऊस :
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी अवकाळीने हजेरी लावली. तुळजापुरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.

 

महाराष्ट्रात ५ जूनपर्यंत आगमन
मान्सूनची सध्याची प्रगती लक्षात घेता मान्सून महाराष्ट्रात ५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण स्थितीत मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊन १० जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापतो. यंदा दोन दिवस आधीच तो दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.

 

श्रेयवादाची लढाई : मान्सूनच्या आगमनाबाबत स्कायमेट आणि आयएमडीने एप्रिल-मेमध्ये अंदाज व्यक्त केले होते. स्कायमेटने २८ मे तर आयएमडीने २९ मे रोजी यंदा केरळात मान्सून दाखल होईल, असे म्हटले होते.

 

> मान्‍सून आगमनाचे निकष
- पावसाचे प्रमाण

केरळातील १४ केंद्रांवर १० मेनंतर या केंद्रांपैकी ६० टक्क्यांहून जास्त केंद्रांच्या ठिकाणी सलग दोन दिवस २.५ मिमी किंवा त्याहून जास्त पावसाची नोंद व्हायला हवी. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी केरळात पावसाचे आगमन झाले हे जाहीर करतात. स्कायमेटच्या मते या १४ पैकी थ्रिसूर वगळता सर्वत्र २६ आणि २७ मे रोजी २.५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला
- वाऱ्याचे प्रमाण
समुद्रसपाटीपासून १५ हजार उंचीपर्यंत वारे असावे. स्कायमेटच्या मते या भागात सध्या वारे २५ ते ३० किमी प्रतितास वेगाने वाहताहेत.
- दीर्घलहरी उत्सर्जन
५ ते १० अंश अक्षांश आणि ७० ते ७५ अंश रेखांशावरील दीर्घलहरींचे उत्सर्जन २०० डब्ल्यूएम-२ (वॅट प्रति चौरस मीटर) हवे. स्कायमेटच्या मते सध्या येथे उत्सर्जन १६० डब्ल्यूएम-२ आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये, यंदा बरसणार...

 

बातम्या आणखी आहेत...