आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: मुशर्रफचे समर्थन करणारे सैफुद्दीन सोज आता म्हणाले पाकला काश्मीर देण्यासाठी तयार होते सरदार पटेल Congress Leader Saifuddin Soz Says Vallabhbhai Patel Was Ready To Give Kashmir To Liaquat Ali Khan

मुशर्रफचे समर्थन करणारे सैफुद्दीन सोज आता म्हणाले- पाकला काश्मीर देण्यासाठी तयार होते सरदार पटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोज यांच्या पुस्तक प्रकाशनाला मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांनाही निमंत्रण होते, परंतु ते गेले नाहीत.

सोजने म्हणाले की, काश्मीरच्या समस्येवर स्वातंत्र्य हे समाधान नाही.

 

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोज म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल व्यावहारिक होते. ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांना काश्मीर देण्यासाठी तयार होते, कारण त्यांना युद्ध टाळायचे होते. ते लियाकत यांना असेही म्हणाले होते की, हैदराबादबाबत नाही, काश्मीरबाबत बोला. काश्मीर घ्या, हैदराबाद नाही. सोज यांनी असाही दावा केला आहे की, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात जाण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन जबाबदार आहे, प. जवाहरलाल नेहरू नाही.

सोज यांनी माध्यमांवर आरोप केला की, त्यांचे परवेझ मुशर्रफवरील वक्तव्य वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले. सोज यांनी 22 जून रोजी म्हटले होते की, ‘‘मुशर्रफ म्हणायचे की, काश्मिरींची पहिली पसंत स्वातंत्र्य आहे. मुशर्रफ यांचे वक्तव्य तेव्हाही योग्य होते आणि आजही योग्य आहे.’’ भाजपाने या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली होती, तर काँग्रेसने अंतर राखले.


काश्मीरला स्वातंत्र्य शक्य नाही: सोज
सोमवारी दिल्लीमध्ये सोज यांचे पुस्तक "काश्मीर: ग्लिम्पसेस ऑफ हिस्ट्री अँड द स्टोरी ऑफ स्ट्रगल' याचे प्रकाशन झाले. येथे जयराम रमेश यांच्याशिवाय इतर काँग्रेसी नेते हजर नव्हते. सोज म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सर्व पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी. स्वातंत्र्य हे काही समाधान नाही. भारताच्या संविधानात काश्मीरला जागा मिळाली पाहिजे. मुशर्रफ यांना दोन्ही बाजूंनी काश्मीरची स्वायत्तता पाहिजे होती. रक्तपातामुळे काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. पाहिजे तर काश्मिरांना मारून टाका, पण यामुळे समस्या सुटणार नाही." 

बातम्या आणखी आहेत...