आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 चिनी सैनिकांचा खात्मा करुन 72 तास लढला हा फौजी, वीरगाथेवर बनतोय चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखादा व्यक्ती मग भलेही तो एखाद्या युद्धातील हिरो असेल, पण त्याची जीवनगाथा प्रकाशितच झाली नसेल तर त्यावर कॉपीराइट कसा लागू होऊ शकतो. हायकोर्टाने 1962च्या भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या रायफलमॅन जसवंत सिंग यांच्या नातेवाईकांना हा सवाल केला आहे. 


विजयगाथेवर बनतोय चित्रपट..
मरणोत्तर महावीरचक्र पुरस्काराने सम्मानित शहीद रायफलमन जसवंतसिंग रावत यांच्या विजयगाथेवर एक चित्रपट बनतोय. यावर सिंग यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की चित्रपटाच्या कथेमुळे कॉपीराईट आणि प्रायव्हसीचे उल्लंघन होत आहे. कोर्टाने या खटल्याची सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार असल्याचे म्हटले आहे. या निमित्ताने divyamarthi.com वाचकांना देशाला चीनपासून देशाला वाचवणाऱ्या या शूर सैनिकाची कहाणी सांगत आहे.


5 जवान करतात शहिदाची सेवा 
1662 च्या भारत-चीन युद्धात सीमेवर 72 तास लढत एकट्याने 300 चीन सैनिकांचा खात्मा करणारे शहीद जसवंतसिंग रावत आजही अमर आहेत. त्यांनी एकट्याने चीनला धूळ चारली आणि अरुणाचल प्रदेश चीनच्या घशात जाण्यापासून वाचविला. अरुणाचल प्रदेशातील नुरानांग येथे बनवलेल्या जयवंतगड वार मेमोरिअल मध्ये त्यांच्या सेवेसाठी आर्मीचे पाच जवान तैनात असतात. एवढेच नाही तर दररोज त्यांच्या बुटांना पॉलीश आणि कपड्यांना इस्त्रीही केली जाते.


दर्शनाशिवाय पुढे जात नाहीत सैनिक
शहीद जसवंत सिंग यांच्या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय कोणीही सैनिक पुढे जात नाहीत असे म्हणतात. एवढेच नाही तर सिंग यांच्या नावापुढे ' स्वर्गीय' शब्दही लावला जात नाही. त्यांना आजही प्रमोशन मिळते. 


पुढील स्लाईड्समध्ये वाचा कोण होते शहीद जसवंत सिंग रावत आणि कशी होती त्यांची वीरगाथा.. 


 

बातम्या आणखी आहेत...