आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैतापूर प्रकल्प कामाला वर्षाअखेरपर्यंत प्रारंभ; प्रकल्पाला वेग देण्याबाबत करार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन भारत दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विमानतळावर प्रोटोकाॅल तोडून मॅक्रोन यांचे स्वागत केले. उभय नेत्यांत हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. उभय देशांत १४ करार झाले आहेत. यात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला वेग देण्याबाबत महत्त्वपूर्ण करार झाला. इंडस्ट्रियल वे फॉर्वर्ड करारावर इलेक्ट्रिसाइट डे फ्रान्स (ईडीएफ) आणि एनपीसीआयएलने स्वाक्षऱ्या केल्या. वर्षाअखेरीस जैतापुरात प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्याचे उद्दिष्ट शनिवारी झालेल्या या करारात ठेवण्यात अाले अाहे. 


...यावर अद्याप एकमत नाही!
प्रतियुनिट वीजेचा दर व क्रेडिट लिमिटबाबत अद्याप दाेन्ही कंपन्यांचे एकमत झालेले नाही. प्रकल्प उभारण्यासाठी फ्रान्स ही रक्कम भारताला देईल. जोवर फ्रान्सची कंपनी आर्थिक अडचणीतून बाहेर पडत नाही तोवर एनपीसीआयएल अंतिम करार करणार नाही, अशी माहिती आहे. 

 

जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प 
२००८ मध्ये भारत-फ्रान्स अणुऊर्जा करार झाला. त्यानुसार जैतापुरात अणुउर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले. ईडीएफ फ्रान्स ही कंपनी जैतापुरात ६ अणुभट्ट्या बसोल. त्यांची क्षमता प्रत्येकी १६५० मेगावॉट असेल. त्या कार्यान्वित झाल्यानंतर ९,९०० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरेल.

 

शिवसेनेचा अाहे विरोध 
जैतापूर प्रकल्पाला स्थानिकांनी पूर्वीपासूनच विरोध केलेला आहे. जपानमधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर तो आणखीच वाढला होता. स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काहीही झाले तरी हा प्रकल्प हाेऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...