आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 भारतीयांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी म्हणाला, 'गुडघ्यावर बसवले अन् गोळ्या झाडल्या!'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  सरकारने चार वर्षांनंतर संसदेत मान्य केले की, इराकमध्ये बेपत्ता झालेले 39 भारतीय जीवंत नाहीत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत याबाबत निवेदन दिले आहे. या मुद्द्यावर राजकारणही होत आहे. या संपूर्ण प्रकरणात एका व्यक्तीची चर्चा आहे. त्याचे नाव आहे, हरजित मसीह. हरजित 2013 मध्ये इराकच्या मोसूल शहरात पोहोचला आणि वर्षभरानंतर कसाबसा भारतात परतला. मसीहने दावा केला आहे की, त्याने चार वर्षांपूर्वीच सांगितले होते की, इराकमधील बेपत्ता असलेल्या त्या 39 भारतीयांपैकी आता कोणीही जीवंत नाही. पण सरकारने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. 


काय म्हणाला हरजित.. 
- हरजित मसीहने सांगितले की, मी जून 2013 मध्ये मोसूलला गेलो होतो. IS च्या जवळपास 50 दहशतवाद्यांनी आमचे अपहरण करून आम्हाला एका कापड फॅक्टरीमध्ये नेले. त्याठिकाणी भारतीय आणि बांग्लादेशींना वेगवेगळे करण्यात आले. आम्हाला 40 भारतीयांना डोंगराच्या परिसरात नेले. 
- त्याठिकाणी आम्हाला सर्वांना गुडघ्यावर बसण्यास सांगण्यात आले. त्यानंतर दहशतवाद्यांनी फायरिंग केले. काहीवेळ किंकाळण्याचा आवाज आला. त्यानंतर सगळीकडे मरणासन्न शांतता पसरली.  
- काही तासांनी जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा माझ्या चारही बाजुंना रक्तच रक्त होते. माझे सर्व 39 सहकारी मारले गेले होते. एक गोळी माझ्या उजव्या पायाला आणि हाताला चाटून गेली होती. मी कसा-बसा त्याठिकाणाहून निघालो. दुसऱ्या टॅक्सीने मला IS च्या ताब्यात असलेल्या चेकपोस्टपर्यंत पोहोचवले. 
- मी त्यांना सांगितले की, मी बांगलादेशी आहे आणि माझा पासपोर्ट हरवला आहे. त्यांनी मला जाऊ दिले. मला माझ्या कंपनीमध्ये परत जाऊ दिले. त्याठिकाणी मी एका जणाकडून फोन मागितला आणि भारतीय दुतावासाशी संपर्क केला. त्यांच्या मदतीने मी 14 जून 2014 ला भारतात परतलो. 


हरजितबाबत सरकारचे मत.. 
सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, हरजितला टॉर्चर करण्यात आले नाही. तर त्याला प्रोटेक्टीव्ह कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचे काहीही कारण नव्हते. उलट सरकारला जबाबदारीने हे प्रकरण सोडवायला हवे होते. आम्ही सर्व पुरावे तपासले. बदूशच्या डोगरातून मिळालेल्या प्रत्येक मृतदेहाची डीएनए चाचणी केली. हे सर्व भारतीयांचे मृतदेह आहे हे समजल्यानंतर आम्ही याबाबात देशाला माहिती दिली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...