आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook कसे करतो तुमचे ब्रेनवॉश! वाचा- 5 ठळक मुद्दे..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फेसबुक सध्या आपल्या युजर्सच्या डाटा चोरी प्रकरणामुळे त्रस्त आहे. आरोप आहे की, युजर्सचा डाटा लीक करून अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. आता प्रश्न असा आहे की, याच्याशी आपल्याला काय देणे-घेणे? पण असे नाही. आपण लक्षात घेतलेच पाहिजे. कारण कुठे ना कुठे तुम्हीही फेसबुकशी जोडलेले आहात. वास्तविक, फेसबुक तुमची पसंत-नापसंत यापासून ते प्रत्येक गोष्ट जी तुम्ही न्यूज फीडवर शेअर करतात, त्याची पूर्ण माहिती ठेवतो. 

चला जाणून घेऊया, युजरचे कसे ब्रेनवॉश होते...

 

1. सर्वात आधी तुमचे बिहेव्हियर जाणून घेतो
- फेसबुक आपल्या प्रत्येक युजर्सचे बिहेव्हियर चांगल्या पद्धतीने जाणून घेतो. साधारणपणे फेसबुक हा डेटा थर्ड पार्टी कंपनीजकडून घेत असतो.
- यानुसार यूजरला कोणती गाडी आवडते, कोणता मोबाइल तो युज करतो, काय वाचणे आवडते आणि खरेदी करणे आवडते, याशिवाय तुमच्याविषयीची बरीचशी माहिती त्यांना मिळते.
- म्हणजेच, युजरबाबत त्यांना सबकुछ माहिती होते. आणि महत्त्वाचे म्हणजे ही माहिती आणखी कुणी नाही, तर युजर आपल्या सहमतीने फेसबुकला देत असतो.
- याशिवाय तुम्ही केलेल्या पोस्टचे Like वा Share करणेही तुमच्या स्वभावाअंतर्गत येते. फेसबुक या माध्यमातूनही तुमची पसंत-नापसंत डिकोड करते.

 

2. मग केला वापर
- अमेरिकी निवडणुकीत याच बिहेव्हियरचा वापर करण्यात आला. येथे युजर्सना त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या प्रोफाइलवर कंटेंट प्रोव्हाइड करण्यात आला.
- मार्क झुकरबर्गनेही जाहीररीत्या हे कबूल केले आहे की, निवडणुका प्रभावित करण्यासाठी फेसबुकचा चुकीचा वापर होत आहे.
- 2019 मध्ये लोकसभा निवडणुका होतील. काँग्रेसवर फेसबुकच्या माध्यमातून 'व्होटर फिक्सिंग'चा आरोप झालेला आहे.
- एकट्या भारतात फेसबुकचे तब्बल 20 कोटी युजर्स आहेत. आणि ही संख्या एकूण फेसबुक युजर्सच्या 10% आहे.

 

3. फेरफार केल्याचा आरोप
- 2014 मध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या रिसर्च पेपरमधून ही बाब समोर आली आहे की, फेसबुकने तब्बल 7 लाख पेक्षा जास्त युजर्सच्या न्यूज फीडमध्ये बदल केला आहे.
- असे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोस्टचा युजर्सवर परिणाम पाहण्यासाठी करण्यात आले होते. तेव्हा काही पोस्ट्स युजर्सपासून लपवण्यात आल्या होत्या, तर काही खूप जास्त दाखवण्यात आल्या होत्या.
- युजर्सवर याचा परिणाम झाला. निगेटिव्ह पोस्ट जास्त पाहणाऱ्यांनी फेसबुकवर बहुतांश तशाच पोस्टस केल्या. म्हणजेच, कुठे ना कुठे युजरचा माइंड कंट्रोल करण्यात आले.
- तथापि, रिसर्च पेपरमध्ये असेही सांगण्यात आले की, या तऱ्हेने 'मनिपुलेशन'चा उल्लेख फेसबुकने आपल्या वापराच्या अटी-शर्तींमध्ये केला आहे.
- परंतु यानंतरही अनेक तज्ज्ञांनी याला फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन रोखणे आणि ब्रेनवॉशची घटना मानले होते.

 

4. अल्गोरिदम तयार केले...
- रिपोर्टनुसार, फेसबुकने यासाठी एक Algorithm तयार केले. यामुळे तुमच्या न्यूज फीडवर तशाच वस्तू पोहोचतात, ज्या तुम्हाला जास्त पाहणे वा जाणून घेणे पसंत आहे.
- म्हणजेच, युजर्सना केव्हा खुश आणि केव्हा नाराज करायचे आहे याचे सर्व नियंत्रण फेसबुककडेच आहे.
- यामुळे तुमच्या न्यूज फीडवर कोणते कंटेंट फेक आहे, याची तुम्हाला काहीही माहिती नसते. आणि ते ट्रॅक करण्याचे कोणतेही टूल नाही.

 

5. थर्ड पार्टी अॅपचीही महत्त्वाची भूमिका
- फेसबुक डाटा चोरी प्रकरण उजेडात आणणारे क्रिस्टोफर वायली यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले की, सोशल मीडियावरील युजर स्वत:चे कौतुक करण्याचा खूप शौकीन असतो.
- यात थर्ड पार्टी अॅपचाही महत्त्वाचा रोल आहे. हीच अशी एकमेव जागा आहे जेथे युजर (म्हणजेच तुम्ही) स्वत:ची जास्तीत जास्त माहिती शेअर करतात.
- थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून तुम्ही सहजरीत्या पर्सनल डाटा अॅक्सेसची परवानगी देता.
- डाटा लीकर्स याच माहितीचा अभ्यास करून पॉलिटिकल कॅम्पेनसहित इतर बाबींसाठी याचा वापर करतात. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेची निवडणूक कशी प्रभावित झाली आणि मार्कचा कबूलनामा