आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलवरी पाणबुडी नौदलाच्‍या ताफ्यात; मोदी म्‍हणाले, भारताच्‍या समुद्री ताकदीचा मुकाबला नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  १७ वर्षांनंतर नौदलाला पारंपरिक पाणबुडी मिळाली आहे. भारतात तयार आयएनएस कलवरी या स्कॉर्पियन श्रेणी पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला. गुरुवारी मुंबईत माझगाव डाॅक येथे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कलवरीचे राष्ट्रार्पण झाले. डिझेल व विजेवर चालणारी ही पाणबुडी देशाच्या ७५०० किमी सागरी सीमेचे संरक्षण करेल. तिची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने केली आहे. अशा ६ पाणबुड्या नौदलात दाखल होतील.


भारताच्‍या समुद्री ताकदीचा कोणताही मुकाबला नाही
- यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्‍हणाले, 'भारताचा 7500 किमीचा समुद्री किनारा आणि 1300च्‍या जवळपास छोटेमोठे बेट हे अशा समुद्री शक्‍तीची निर्मिती करतात, ज्‍याचा जगात कोठेही मुकाबला नाही. हिंदी महासागर केवळ भारतासाठीच नव्‍हे तर संपूर्ण जगासाठी अतिशय महत्‍त्‍वाचा आहे. असे म्‍हटले जाते की, 21 वे शतक हे आशियाचे शतक आहे. आणि याचा मार्ग निश्चितच हिंदी महासागरातून जाणार आहे.'
-  'ज्‍या पद्धतीने भारताचे आर्थिक आणि राजकीय संबंध वाढत आहेत त्‍यामुळे भारत आपले लक्ष्‍य गाठणे सोपे होणार असल्‍याचे दिसत आहे. देशाची समुद्री ताकदीमुळे देशाची आर्थिक ताकदही वाढते.'
- 'समुद्री मार्गे येणारा दहशतवाद असो, पायरसीची समस्‍या असो नाहीतर ड्रग्‍स तस्‍करीचे आव्‍हान असो, या समस्‍यांचा निपटारा करण्‍यासाठी भारत सज्‍ज आहे. यामध्‍ये भारत भुमिका ही अतिशय महत्‍त्‍वाची असणार आहे. सब का साथ सबका विकास हा आमचा संकल्‍प जल-जमिन-आकाश सर्वांसाठी एकमसान आहे. आम्‍ही वसुधैव कुटुंबकम  हा विचार समोर घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.'  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कलावरी पाणबुडीचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...