आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्फ बोर्ड म्हणाले-ताजमहाल शहाजहाँने आमच्या नावे केला होता, SCने मागितले पुरावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- सुप्रीम कोर्टाने वक्फ बोर्डाला विचारले-शहाजहाँ तर तुरुंगात कैदेत होता. मग वक्फनाम्यावर सह्या कशा केल्या. तुम्ही कागदपत्र दाखवा. 

- वकिलांनी कोर्टात सांगितले की, वक्फ बोर्ड ज्या प्रकारचा दावा करत आहे, तसा काहीही वक्फनामा नाही. 


नवी दिल्ली - ताजमहालावरील मालकी हक्काबाबत उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने मंगळवारी सुप्रीम कोर्टात दावा केला होता. त्यात स्वतः मोगल बादशहा शहाजहाँने बोर्डाच्या नावे पक्षाचा वक्फनामा केला होता, असे म्हटले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने पुरावा म्हणून, शहाजहाँची सही असलेले कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डाला एका आठवड्यात हे कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. ताजमहालावरील मालकी हक्कावरून सुन्नी वक्फ बोर्ड आणि पुरातत्व विभाग यांच्यात वाद सुरू आहे. 


कोर्ट म्हणाले, कोणाचा विश्वास बसेल.. 
- कोर्टाने म्हटले की, मोगलकाळाचा अंत होताच, ताजमहालसह इतर ऐतिहासिक इमारती इंग्रजांकडे हस्तांतरीत झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतरपासून हे स्मारक सरकारकडे आहे आणि पुरातत्व विभाग त्याचे संवर्धन करत आहे. 
- चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील बेंचने म्हटले, ताजमहाल वक्फ बोर्डाचा आहे यावर भारतात कोणाचा विश्वास बसेल? अशा मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया घालवायला नको. 


सह्या असलेले दस्तऐवज दाखवा 
बोर्डाकडून वरीष्ठ अॅडव्होकेट व्हीव्ही गिरी यांनी म्हटले की, बोर्डाच्या बाजुने शहाजहाँनेच ताजमहालाचा वक्फनामा तयार केला होता. त्यावर लगेच कोर्टाने म्हटले, मह शहाजहाँची सही असलेले दस्तऐवज दाखवा. कोर्टाने त्यांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. 


शहजहाँ तुरुंगात होता, मग सही कशी केली?
चीफ जस्टीस दीपक मिश्रा यांनी वक्फ बोर्डाच्या वकिलांना काही प्रश्नही केले. त्यात ते म्हणाले, शहाजहाँने वक्फनाम्यावर सह्या कशा केल्या? कारण ते तर तुरुंगात कैदेत होते. ते कैदेतूनच ताजमहाल पाहत होते. कोर्टाने वक्फ बोर्डाने त्यांच्या नावावर ताज महालाची नोंदणी करण्याच्या आदेशालाही स्थगिती दिली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...